फेसबूक (Facebook) हे तरूणांमधील लोकप्रिय असे सोशल मीडिया (Social Media) माध्यम आहे. जगभरातून कोट्यवधी युजर्स फेसबुकचा वापर करत असतात. तसेच फेसबुक हे आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवे फिचर आणत असते. मात्र, तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये असे काही मित्र असतात. जे वारंवार तुम्हाला आवडत नसलेल्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट पाहून अनेकदा कंटाळा येतो. महत्वाचे म्हणजे, ते आपले मित्र असल्यामुळे आपण त्यांना अन फ्रेंडही करु शकत नाहीत. यासाठी फेसबूकमध्ये अशा अनेक ट्रिक्स आहेत. ज्यामुळे फेसबुकचा वापरकर्त्यांच्या आनंदात आणखी भर पडू शकते.
1) ऑनलाईन स्टेटस इतरांपासून लपवू
फेसबूक हे नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवे फिचर आणत असतो. त्याचप्रमाणे फेसबूकवर आणखी एक खास फिचर आहे. ज्याच्या मदतीने काही लोकांपासून ऑनलाईन लपवता येतात. तसेच मेसेजही ब्लॉक करता येतात. फेसबूकचा वापर करत असताना अनेकदा आपणांस अनोखी लोकांचे मॅसेज येत असतात. यासाठी सेटिंग्समध्ये देण्यात आलेल्या ब्लॉकिंग आप्शनमध्ये जा. ब्लॉक युजर्सचा एक सेक्शन मिळेल. ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे, अशा व्यक्तीचे नाव टाईप करा. त्यानंतर त्यांच्या नावासमोर ब्लॉक हे ऑप्शन दिसेल.
2) बर्थडे नोटिफेशन बंद करने
फेसबूक हे नेहमी त्याच्या युजर्सला त्याच्या यादीतील मित्रांचे वाढदिवस असल्यास नोटिफिकशन देत असतो. अनेकदा याचा युजर्सला फायदा होतो. तसेच काहीवेळा आपणांस न आवडत्या लोकांची नोटिफिकेशन आल्यानंतर रागही येतो. अशा प्रकारचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑप्शनमध्ये बर्थडे टर्न ऑफ करा. यानंतर नको असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाहीत.
3)फेसबुक डेटा डाऊनलोड करणे
फेसबुक युजर्सना त्यांचा कोणताही डाटा पूर्णपणे डाऊनलोड करता येतो. डाऊनलोड करण्यासाठी सेटिंग्समध्ये गेल्यावर युअर फेसबूक इंन्फोर्मेशनचा पर्याय दिसेल. त्यावरुन युजर्स सर्व डेटा डाऊनलोड करु शकतात.
4) ऍप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट बंद करा
फेसबूक वापरत असताना अनेकदा युजर्सला ऍप इन्व्हाइट्स किंवा गेम रिक्वेस्ट बंद वारंवार पॉपअप होत असतात. अशा जाहीरातींना कायमचे हटवण्यासाठी फेसबुकने नवीन फिचर आणले आहेत. ज्यामुळे नको त्या गेम रिक्वेस्ट थांबवता येणार आहे. ज्या युजर्सला या रिक्वेस्टचा कंटाळा आला असेल तर, ते सेंटिंग्समध्ये ब्लॉकिंग ऑप्शनवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर ब्लॉक अॅप इन्व्हाईटचा पर्याय मिळेल. तिथे क्लिक करुन अॅप इन्व्हाईट ब्लॉक करा.
5) फेसबुक मेसेजवर सीन बंद करा
सध्या अनेकजण कॉलिंगपेक्षा चॅटिंगवर अधिक भर देत असतात. यातच चॅटिंग करत असताना समोरच्या व्यक्तील तुम्ही मॅसेज वाचला हे समजू नये असे वाटत असेल तर यासाठीही फेसबुकजवळ पर्याय आहे. ज्यामुळे तुम्ही केलेले मॅसेज सुरक्षित राहतात. मात्र, यासाठी युजर्सला अनसीन फॉर फेसबूक क्रोम एक्सटेन्शन डाऊनलोड करावे लागेल. हे इंस्टॉल केल्यानंतर ब्राउजर टूल बारमध्ये देण्यात आलेल्या मेसेंजर आयकॉनवर टॅप करा आणि ते ऑन करा. यामुळे युजर्सला आपली माहिती गुपीत ठेवता येणार आहे.