
आज (गुरुवार, 14/3/2019) सकाळापासूनच फेसबुक डाऊन आहे. यामुळे हजारो, लाखो युजर्स त्रस्त आहेत. फेसबुक अकाऊंट लॉगिन केल्यावर ते ओपन होत नसून त्यावर त्यावर एक संदेश दिसत आहे. काही कारणास्तव ही सेवा ठप्प झाली आहे आणि त्या संदर्भातील काम सुरु आहे, असा मेसेज स्क्रिनवर दिसत आहे. यासंदर्भात फेसबुकने ट्विट करत सांगितले की, आम्ही लवकरच सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. युजर्सच्या मोबाईल अॅप आणि डेक्सटॉपवर फेसबुक सुरु आहे. मात्र मोठ्या संख्येने युजर्सला फेसबुकची सेवा मिळत नाही आहे.
काल (बुधवार, 13 मार्च) फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हाट्सएप (WhatsApp) सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ डाऊन होतं. काही युजर्सकडे फेसबुक अकाऊंट ओपन होत नव्हतं तर काहींकडे लाईक आणि कमेंट दिसत नव्हतं. त्यानंतर होणारा त्रास सोशल मीडिया माध्यमातून युजर्सने व्यक्त केल्या. फेसबुक डाऊनची समस्या वेबसाईट आणि अॅप दोघांवरही दिसून आली.
इतकंच नाही तर गुगलची लोकप्रिय जीमेल सेवा देखील काल सकाळी ठप्प झाली होती. त्यामुळे जीमेल अकाऊंट युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ईमेल मिळत नव्हते. Gtalk वर चॅट करताना अडसर येत होता. जीमेलवर अटॅच्य डाक्युमेंट्स डाऊनलोड होत नव्हते. यामुळे युजर्स अत्यंत त्रस्त होते. त्यातच Google Drive देखील चालत नव्हते. सोशल मीडियातून युजर्सने समस्या व्यक्त केल्यानंतर गुगलकडून जगभरातील युजर्सची माफी मागण्यात आली.