गुगलची (Google) लोकप्रिय ईमेल सर्व्हिस जीमेल (Gmail) आज ( बुधवार, 13/3/2019) सकाळी डाऊन झाली आहे. त्यामुळे जीमेल युजर्संना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. Gmail अकाऊंटवर ईमेल मिळत नाही आहेत. तसंच Gtalk चॅट करतानाही युजर्सला अनेक अडचणी येत आहेत. Gmail वर अॅटॅच डाक्यूमेंट्स, फाईल्स डाऊनलोड होत नसून Google Drive देखील चालत नाही आहे. या सर्व प्रकारामुळे जगभरातील लाखो-करोडो युजर्स त्रस्त असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला त्रास व्यक्त करत आहेत.
जगभरात Gmail ला लोक प्रथम पसंती देतात. भारतात देखील Gmail ची लोकप्रियता चांगलीच आहे. यापूर्वी लोक Yahoo mail, Reddiff mail आणि Sify mail चा वापर करत होती. मात्र Gmail च्या आगमनानंतर अधिकतर लोकांनी त्याला पसंती दर्शवली.
अलिकडेच जीमेलमध्ये बदल करत गुगलने ईमेलिंग प्लॅटफॉर्मवर राईट क्लिक मेनू जोडला. त्यामुळे तुम्ही अगदी सहज लेबल जोडू शकता, मुव्ह करु शकता, म्युट करु शकता. तसंच ईमेल स्नुज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी राईट मेन्यूत फक्त तीन पर्याय दिले होते.