फेसबुक (Photo Credits: ANI)

फेसबुकने भरातीयांची दिवाळी अधिकच खास केली आहे. दिवाळीच्या औचित्यांवर ‘Diwali Stories’ हे नवं फीचर फेसबूकने लाँच केलं आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे आह 7 नोव्हेंबरपासून हे फीचर उपलब्ध करण्यात आलं आहे. दिवाळीतील खास फोटो युजर्सला या फीचरद्वारे शेअर करण्याची सोय आहे.

फेसबुकवर ‘Share your Stories this Diwali’ या पर्यायाद्वारे युजर्सना तुम्ही दिवाळीमध्ये केलेली धम्माल मस्ती इतर युजर्सासोबत शेअर करण्याची सोय देण्यात आली आहे. newsfeed आयकॉनमध्ये दिवाळी स्टोरीजचा पर्याय उपलब्ध होईल. या पर्यायाचा वापर करून फोटोसोबतच व्हिडिओ, बुमरँग, लाइव्ह व्हिडिओ युजर्सना शेअर करण्याची सोय देण्यात आली आहे. फोटोंना काही फिल्टरही देण्यात आले आहे. त्यामुळे ते हटके आणि आकर्षक करण्याची सोय उपलब्ध आहे.

इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे फेसबुक स्टोरी हे नवं फीचर फेसबुकनं काही महिन्यांपूर्वी लॉन्च केलं आहे. इंस्टाग्रामवरील स्टेटस ऑनलाईन शेअर करण्याचीही सोय आहे. आता दिवाळीचा मुहूर्त साधत युजर्सनी फेसबुक फीचर हा पर्याय अधिक लोकांनी वापरावा याकरिता तो अधिक आकर्षक करण्यात आला आहे.