FaceApp | (File Photo)

FaceApp Controversy: FaceApp प्ले स्टोरवर आलं आणि हा हा म्हणता म्हणता ते व्हायरलही झालं. लोकानीही मग FaceApp द्वारे आपल्या आयुष्यातील वयोमानाच्या विविध टप्प्यांवर कसे दिसतो हे जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करायला सुरुवात केली. प्ले स्टोरच्या माध्यमातून अनेकांचे स्मार्टफोन या अॅपचे स्वागत करु लागले. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये FaceApp ला स्थान दिले असेल, तुम्हीही FaceApp युजर असाल तर सावधान. FaceApp वापरण्यापूर्वी त्याबाबत आगोदर जरुर जानून घ्या. मगच हे अॅप वापरा.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांनी FaceApp वर मोठा आक्षेप घेतला आहे. या तज्ज्ञांचा आक्षेप असा की, आर्टिफीशल इंटेलिजेंस वर काम करणाऱ्या या अॅपची प्रायव्हसी पॉलिसी योग्य नाही. यात युजर्सच्या सिक्यॉरिटी आणि प्रायव्हसीला धोका आहे. या अॅपचा वापर केल्यास युजर्सचा डेटा लिक होऊ शकतो. तसेच, काहींचे म्हणने तर असे की, फेसअॅप हे युजर्सचा डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर करु शकते. असे असले तरी, फेसअॅपने या आक्षेपांचे खंडण करत म्हटले आहे की, 48 तासांच्या कालावधीनंतर युजर्सचे फोटो सर्व्हरवरु ऑटोमैटिकली डिलीट होतात. (अधिक माहितीसाठी हेही वाचा, धक्कादायक! FaceApp वापरणाऱ्या लोकांची सुरक्षा धोक्यात; रशियन कंपनीला मिळत सर्व वैयक्तिक माहिती)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार FaceApp वापरलेल्या अनेक युजर्सना आता आपल्या प्रायव्हेसीबाबत चिंता वाटू लागली आहे. दुसऱ्या बाजूला काही इंटरनेट एक्सपर्ट्सचे म्हणने आहे की, प्रायव्हसीच्या बाबतीत बोलायचे तर FaceApp हे इतर अॅपप्रमाणेच आहे. फ्रेंच सिक्यॉरिटी रिसर्चर एलियॉट एंडरसन यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, 'युजर FaceAppच्या अस्पष्ट नियम आणि अटींबाबत नाराज आहेत. पण, फोनमध्ये इंस्टॉल्ड अधिक अॅप हे शक्यतो नियम आणि अटींसोबतच येतात. जर युजर्सनी ही माहिती एकदा वाचली तर युजर्स स्वत:च हे अॅप अनइंस्टॉल करतील. उदाहरणार्थ म्हणून स्नॅपचॅट सारख्या अॅपचे देता येईल'.

एलियॉट एंडरसन ट्विट

दरम्यान, अनेक युजर्सनी FaceApp द्वारे आपण वयोमानाच्या विविध टप्प्यांवर कसे हे जाणून घेतले आहे. इतकेच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी मंडळी आणि सर्वसामान्य नागरिकांनी असे फोटो आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. काहींनी आपल्या व्हॅट्सअपचे डीपी म्हणूनही हे फोटो ठेवले आहेत. तर, काहींनी हँगआऊट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रमैत्रिण आणि नातेवाईकांना शेअर केले आहेत.