Neuralink's Brain Computer Link Technology: एलन मस्क (Elon Musk) यांची कंपनी न्यूरालिंक (Neuralink's) मागील काही दिवसांपासून मानवी मेंदू समजून घेणाऱ्या चीपवर काम करत आहे. आतापर्यंत न्यूरालिंक कंपनीने यासंदर्भात अनेक प्रयोग केले आहेत. यावेळी न्यूरालिंक ने डुक्कराच्या मेंदूमध्ये छोटया नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चीप बसवलेल्या डुक्कराचे प्रदर्शन केले. मानवी मेंदूशी निगडीत असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी एलन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी नवीन टेक्नोलॉजी विकसित करत आहे.
दरम्यान, ही चिप दोन महिने डुक्करच्या मेंदूमध्ये होती. एलन मस्कची कंपनी न्युरलिंकची स्थापना 2016 मध्ये झाली होती. न्युरोलिंकचा हेतू वायरशिवाय मानवी मन वाचणे हा आहे. या चिपचा सर्वाधिक फायदा अल्झायमरच्या रुग्णांना होणार आहे. या संशोधनातून स्मृती नष्ट होणे, श्रवणशक्ती कमी होणे, निद्रानाश आदी समस्यांचे निराकरण करण शक्य होणार आहे. (हेही वाचा - UPSC अभ्यासक्रमामध्ये Islamic Studies समावेश? IPS Association ने फेटाळलं व्हायरल वृत्त)
विषेश म्हणजे न्युरलिंकने बनवलेली ही चीप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना एलन मस्क यांनी सांगितले की, ही चीप स्मृतिभ्रंश, नैराश्य आणि इंसोमेनिया या आजारांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. इम्प्लांटेबल उपकरणांमुळे वास्तवात या समस्यांचे निराकरण होऊ शकते. या संशोधनातून केवळ पैसा कमवणे हा उद्देश नाही. जगातील बुद्धीमान व्यक्तींनी न्युरालिंकमध्ये येऊन काम करावे, यासाठी प्रयत्न करत आहोत,’ असंही एलन मस्क यांनी यावेळी सांगितलं.
हा प्रयोग करताना तीन डुक्करांना आणण्यात आलं होतं. यातील गॅटर्ड नावाच्या डुक्करावर हा प्रयोग करण्यात आला. संशोधनादरम्यान या डुक्कराला जेवण दिलं गेलं. त्यावेळी त्याची मनस्थिती लाईव्ह स्वरुपात दाखवण्यात आली. न्युरालिंक कंपनीने आतापर्यंत 19 प्रकारच्या जनावरांवर या चीपचा प्रयोग केला आहे.