Representational Image (Photo Credits: File Image)

भारतामध्ये सध्या विविध धर्मांमधील सांमजस्य आणि सख्य याला धक्का पोहचवणार्‍या काही फेक न्यूज प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान त्यापैकी एक म्हणजे युपीएससीच्या (UPSC) परीक्षांमध्ये इस्लामिक स्टडीजचा समावेश. दरम्यान एका न्यूज चॅनेलच्या वृत्ताचा हवाला देत अनेक नेटकर्‍यांनी ही फेक न्यूज शेअर केली आहे. आता युपीएससीमध्ये इस्लामिक स्टडीज ( Islamic Studies) समाविष्ट केल्यावरून अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. मात्र आयपीएस असोसिएशन (IPS Association ) कडून हे वृत्त खोटं असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान सुदर्शन न्यूज चॅनलचा टीझर शेअर करत 28 ऑगस्टच्या कार्यक्रमाला 'युपीएससी जिहाद' असं नाव दिलं आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर अनेक उजव्या विचारसणीच्या लोकांनी सरकारवर टीका केली. आयपीएस असोसिएशनने देखील त्यावर खुलासा करत वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. 'मीडीयाच्या विशिष्ट धर्मावरून सिव्हिल सर्व्हिसच्या उमेदवारांना टार्गेट करण्याचा प्रकाराचा आम्ही निषेध करतो. हा पत्रकारितेमधील बेजबाबदारपणा आहे. असे ट्वीट करत आयपीएस असोसिएशनने वृत्त फेटाळले आहे. अरूण बोहरा सारखे अनेक आयपीएस ऑफिसर यासाठी पुढे आले होते.

अरूण बोहरा ट्वीट

धर्मावरून नागरी सेवा परीक्षा देणार्‍यांचे असे विभाजन होऊ शकत नाही. आमची ओळख फक्त भारतीय अशीच असते अशा आशयाचं ट्वीट देखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर दएखील अशाप्रकारे इस्लामिक स्टडीजचा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्याचं वृत्त नाही. त्यामुळे न्यूज चॅनेलकडून केला जाणारा दावा तथ्यहीन आहे.