Elon Musk Removed Doggy Logo: इलॉन मस्कने हटवला डॉगीचा लोगो; Dogecoin कंपनीला 12 हजार कोटींचा तोटा
Dogecoin, Twitter (PC- Wikipedia and Pixabay)

Elon Musk Removed Doggy Logo: सोमवारी इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या लोगोमधून पक्षी काढून कुत्र्याचा फोटो टाकला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण मस्कच्या या निर्णयामुळे एका कंपनीची चांदी झाली आहे. क्रिप्टोकरन्सी dogecoin चे दर सतत वाढू लागले. त्याचे मूल्य 27 टक्क्यांपर्यंत वाढले. आणि Dodgecoin चे मार्केट कॅप देखील $13 अब्ज पार केले. मात्र आता तोच कुत्रा कंपनीसाठी अडचणीचा ठरला आहे. कारण मस्कने पुन्हा एकदा डॉगीऐवजी पक्ष्याचा ट्विटरचा लोगो बनवला आहे.

मस्कच्या हालचालीनंतर, डॉजकॉइनचे मूल्यांकन सुमारे 1.50 अब्ज डॉलरने कमी झाले आहे. डॉजकॉईनला सुमारे 12 हजार कोटींचा फटका बसला आहे. (हेही वाचा - Elon Musk याचा नवा फंडा, 'ब्लू टीक' घ्या आणि टाईमलाईनवर जाहिरातींपासून 50% सुटका मिळवा, दृश्यमानताही वाढवा)

मस्कने लोगो का बदलला?

जेव्हा मस्कने ट्विटर विकत घेतले तेव्हा एका ट्विटर वापरकर्त्याने त्यांना त्याचा लोगो बदलण्याची सूचना केली. सोमवारी लोगो बदलल्यानंतर मस्कने त्या युजरला सांगितले की, 'आश्वासन दिल्याप्रमाणे'. म्हणजेच ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचा लोगो बदलण्याचे वचन त्याने पूर्ण केले. मात्र, आता त्यांनी पुन्हा जुना पक्षी लोगो स्वीकारला असल्याने त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, मस्क हे आधीपासूनच डॉजकॉइनचे समर्थक आहेत.

Crypto.com च्या मते, मस्कच्या निर्णयापूर्वी 2 एप्रिल रोजी डॉजकॉइनचे बाजार मूल्य 10.97 $ अब्ज होते. ज्यामध्ये खरी तेजी सोमवारी संध्याकाळी 5.30 नंतर मस्कच्या ट्विटनंतर आली. आणि 5 एप्रिल रोजी क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात 27 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याचे बाजार मूल्य 13.20 आणि 13.34 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. पण आता मस्कने डॉगीला काढून टाकल्याने, डॉजकॉइनचे बाजारमूल्य 6 एप्रिल रोजी 11.85 अब्ज डॉलरवर आले आहे. अशा स्थितीत कंपनीचे मार्केट कॅप 1.5 बिलियन डॉलरने कमी झाले आहे.