Elon Musk (Credit- ANI)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे नुकतेच ट्विटरचे (Twitter) नवे बॉस बनले आहेत. आता मस्क यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. या क्रमवारीत, एका आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ट्विटरच्या नवीन बॉसने कंपनीचे नवीन कार्य धोरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे.

अहवालातील दाव्यानुसार, मस्कने कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सातही दिवस तेही 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्विटरच्या अंतर्गत परिपत्रकात असे म्हटले आहे की, असे न केल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम, शिफ्टच्या वेळा, अतिरिक्त वेतन, भत्ते आणि नोकरीची सुरक्षा आदींबाबत चर्चा न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशात म्हटले आहे.

दाव्यानुसार, अहवालात असेही म्हटले आहे की अभियंत्यांना नोव्हेंबरच्या सुरुवातीची अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि मस्कच्या अपेक्षेप्रमाणे जर ते टर्नअराउंड आवश्यकता पूर्ण करू शकले नाहीत तर ते त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात. या निर्णयामुळे मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या कर्मचार्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यांना भीती वाटू लागली आहे की, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांना कंपनीमधून काढून टाकू टाकले जाईल. (हेही वाचा: Twitter Verification: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर Blue Tick साठी प्रति महिना आकारणार 20 डॉलर)

अभियंत्यांसाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीस टास्क पूर्ण करणे हे ट्विटरमध्ये त्यांच्या करिअरसाठी एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जाते. यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, एलोन मस्क आपल्या कर्मचार्‍यांना अधिक काम करण्यास आणि आदेशांचे पालन करण्यास भाग पाडत आहे. टेस्लाच्या सीईओने $44 बिलियन मध्ये ट्विटर विकत घेतले आहे आणि आता त्याचा खर्च वसूल करण्यासाठी ते झटपट निर्णय घेत आहेत.