गूगल (Google) कडून आज डॉ.कमल रणदिवे (Dr. Kamal Ranadive)या भारतीय सेल बायोलिस्ट यांच्यासाठी खास डूडल बनवण्यात आलं आहे. कमल राणादीव 104 व्या जन्मदिनाचं (Dr. Kamal Ranadive’s 104th Birthday) औचित्य साधत त्यांनी हे डूडल साकारलं आहे. रणदिवे यांनी कर्करोगामध्ये संशोधनासाठी आपलं आयुष्य वेचलं. तसेच विज्ञान आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. दरम्यान आजचं गूगल डूडल (Google Doodle) भारतीय वंशाचे कलाकार Ibrahim Rayintakath यांनी साकारले आहे. यामध्ये डॉ. रणदिवे मायक्रोसोपमध्ये पाहत असल्याचं दिसत आहे.
Kamal Samarath या Kamal Ranadive म्हणून अधिक ओळखल्या जातात. त्यांचा जन्म पुणे शहरामध्ये 1917 साली झाला. त्यांच्या वडिलांनी मेडिकल मध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली पण त्याचा कल बायोलॉजीकडे अधिक होता. 1949 साली त्यांना cytology मध्ये doctorate पदवी मिळाली आहे. त्यावेळी त्या Indian Cancer Research Center मध्ये रिसर्चर म्हणून काम करत होत्या. अमेरिकेच्या Johns Hopkins University in Baltimore, Maryland मध्ये त्यांना फेलोशीप मिळाली होती. नंतर त्या मुंबई मध्ये परतल्या होत्या. भारतामध्ये येऊन त्यांनी देशातली पहिली टिश्यू कल्चर लॅबोरेटरी सुरू केली. नक्की वाचा: Kadambini Ganguly Google Doodle: डूडल साकारुन गूगल साजरी करतंय कादंबिनी गांगुली यांची 160 वी जयंती .
रणदिवे या पहिल्या संशोधक होत्या ज्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवंशिकता यांच्यामधला दुवा शोधला. सोबतच कॅन्सर आणि काही व्हायरस यांच्यामध्येही त्यांनी विशेष काम केले आहे. 1973 साली डॉ. रणदिवे आणि 11 सोबतींनी Indian Women Scientists’ Association (IWSA)ची स्थापना केली. त्यांच्या द्वारा विज्ञान क्षेत्रात महिलांना सपोर्ट करण्यास सुरूवात झाली.
रणदिवे यांनी विद्यार्थी आणि भारतीय स्कॉलर्स यांना भारतामध्ये परत येऊन त्यांचं ज्ञान आपल्या लोकांसाठी वापरण्यास प्रेरणा देत होत्या. 1989 मध्ये त्या भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन काम केले.