Kadambini Ganguly Google Doodle | | (Photo Credits: Google )

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांच्या सन्मानार्थ गूगलने आज डूडल (Kadambini Ganguly Google Doodle) साकारत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. कादंबिनी गांगुली यांची 160 वी जयंती (Kadambini Ganguly's 160th Birthday) आहेत. ज्या काळात महिला बुरख्यात राहात असत त्या काळात त्यांनी समाजपरविर्तनासाठी काम केले. वैद्यकीय परीक्षण क्षेत्रात तेव्हा पुरुषांचे प्रमाणच अधिक होते. खरे तर त्या काळात फक्त पुरुषच अशा प्रकारचे काम करत असत. महिलांना कामाला तशी संधीच नव्हती. अशा काळात कादंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) यांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केले. इतकेच नव्हे तर त्या इतरांसाठी प्रेरणाही बणल्या.

ब्रिटीशकालीन भारतात आताच्या बांग्लादेशमध्ये असलेल्या भागलपूर येथे 18 जुलै 1861 मध्ये कादंबिनी गांगुली यांचा जन्म झाला. त्या पुढे जाऊन डॉक्टर आणि स्वातंत्र्य सेनानी बणल्या. महिला अधिकार संघटनेच्या पहिल्या सह-संस्थापकही म्हणूनही त्यांनी काम केले. ज्याकाळात समाज महिला शिक्षणाच्या बाजून नव्हता त्या काळात कादंबिनी गांगुली यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. 1883 मध्ये त्यांनी इतिहासातून पदवीचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी 1884 मध्ये कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वैद्यकीय कॉलेजमध्ये परवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1986 मध्ये त्यांनी आपली वैद्यकीय परीक्षण पदवी प्राप्त केली. पुढे युकेमध्ये जाऊन त्या काम करु लागल्या.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करु लागल्या. खासगी प्रॅक्टीससाठी त्या भारतात परतल्या. दरम्यान, 03 ऑक्टोबर 1923 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादंबिनी गांगुली यांच्या जीवनावर वर्ष 2020 मध्ये एक प्रोथोमा कादंबिनी बॉयोग्राफी टेलीविजन सीरीज सुद्धा आली होती. ज्याचा उद्देश नव्या पिढीसाठी प्रेरणादाई असल्याचे सांगितले जाते. गुगलने आज डूडल बनवून त्यांचे स्मरण केले आहे.