Customer Care Scam: चुकूनही 'हे' 7 अ‍ॅप डाऊनलोड करू नका; अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसा होईल गायब
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय, फसवणुकीच्या प्रकरणांतही अधिक भर पडली आहे. यातच इंटरनेट वापरकर्त्यांसाठी कस्टमर केअर स्कॅम (Customer Care Scam) एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी नेहमी सावधानी राहावे, असे अवाहन सायबर गुन्हे शाखेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही बरेच लोक अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडतआहेत. यातच मोबाईलमध्ये असलेले काही अ‍ॅप तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे गायब करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे हे अ‍ॅप नेमके कोणते आहेत, याची सर्वांनाच माहिती असणे गरजेचे आहे. तर, अशा धोकादायक अॅप्सबाबत जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

कस्टमर केअर फ्रॉडमध्ये, रिमोट कंट्रोलवाले अ‍ॅप सर्वाधिक नुकसान पोहचवतात. सायबर क्राईम करणारे मेसेजद्वारे लोकांना एक लिंक पाठवतात आणि रिमोट एक्सेसवाले एखादे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगतात. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, फोनचा संपूर्ण एक्सेस फ्रॉड करणाऱ्यांकडे जातो. त्यानंतर फ्रॉड करणारे फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरू करतात. त्यानंतर यूपीआय लॉगइन करताना फोनमध्ये आलेला ओटीपी पाहिल्यानंतर लोकांची फसवणूक होते. हे देखील वाचा- खुशखबर! Flipkart आता मराठी भाषेतही उपलब्ध, अन्य प्रादेशिक भाषांचाही समावेश

अॅपची यादी-

1) टीम व्हिव्हर क्विक सपोर्ट (Team Viewer Quick Support)

2) मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप (Microsoft Remote Desktop)

3) ऐनीडेस्क रिमोट कंट्रोल (AnyDesk Remote Control)

4) एअरड्रॉइड: रिमोट एक्सेस अॅन्ड फाइल (AirDroid: Remote Access and File)

5) एअर मिरर: रिमोट सपोर्ट अॅन्ड रिमोट कंट्रोल डिव्हाइस (AirMirror: Remote Support and Remote) Control Devices)

6) क्रोम रिमोट डेस्कटॉप (Chrome Remote Desktop)

7) स्प्लॅशटॉप पर्सनल- रिमोट डेस्कटॉप (Splashtop Personal- Remote Desktop)

महत्वाचे म्हणजे, कोणतीही कंपनीचे कस्टमर केअर सपोर्ट कधीही रिमोट कंट्रोलचे अॅप  डाऊनलोड करण्यास सांगत नाही. यामुळे अशा प्रकारच्या फोनपासून सावध राहणे गरजेचे आहे. नाहीतर, इतर लोकांप्रमाणे तुमच्याही अकांऊटमधील पैसा गायब होण्याची शक्यता आहे.