18 OTT Apps Ban In India: ऑनलाईन माध्यामांतील ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सततच्या अश्लिल कॉन्टेंटमुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अश्लिल माहितीबद्दल सातत्याने इशारा दिल्यानंतर आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 OTT प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले आहेत. या संदर्भात ANI वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. हेही वाचा- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नोटिशीनंतर लोकशाही वृत्तवाहिनी 72 तासांसाठी निलंबित
ओटीटी वेबसाईटबरोबरच देशात 19 वेबसाईट, 10 अॅप्स, OTT प्लॅटफॉर्मचे 57 सोशल मीडिया हॅंडल देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनालाईन माध्यमांतून महिलांचे अशोभनीय प्रतिनिधीत्व कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पाहा ब्लॉक OTT प्लॅटफॉर्मची संपूर्ण यादी
- ड्रीम्स फिल्म्स
- Voovi
- अनकट अड्डा
- ट्री फ्लीक
- एक्स प्राईम
- नीऑन एक्स व्ही आय पी
- बेशरम्स
- हंटर्स
- रॅबिट
- एक्स्ट्रामुड
- नीओफ्लीक्स
- मूड एक्स
- मोजफ्लिक्स
- हॉट शॉट व्हीआयपी
- फुगी
- चिकूफ्लिएक्स
- प्राईम प्ले
- येस्मा