भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांचा कथितपणे एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल लोकशाही वृत्तवाहिनीला मोठा दणका बसला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Information and Broadcasting) सूचनेनंतर 72 तासांच्या कालावधीसाठी लोकशाही वृत्त वाहिनीला कंटेंट प्रसारित करण्यापासून निलंबित करण्यात आले आहे. चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांनी याची पुष्टी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता वाहिनीचे प्रक्षेपण बंद झाले. सुतार यांनी सांगितले की, कायदेशीर मार्गाने हे प्रकरण हाताळण्याचा त्यांचा मानस आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी व्हिडिओच्या कथित प्रसारणासाठी सुतार आणि एका YouTuber विरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील लैंगिक छळाच्या घटनांबाबत विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला उत्तर म्हणून या व्हिडिओबाबत चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा तपास अजूनही गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
संपादक कमलेश सुतार यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘मला आमच्या दर्शकांना एक महत्त्वाचे अपडेट द्यायचे आहे. सोमय्या यांच्यावरील एका कथेबाबत आय अँड बी मंत्रालयाने आम्हाला यापूर्वी नोटीस दिली होती, त्यानंतर आम्ही आमचे म्हणणे मांडले होते. आता आम्हाला 72 तासांसाठी चॅनल बंद करण्यास सांगणारी नोटीस मिळाली आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून, पुढील 72 तास तुम्ही आमचे चॅनल पाहू शकणार नाही. यासाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत.’
Lokshahi Marathi: प्रकरणाचा तपास सुरु असतानाच थेट शिक्षा सुनावली...#Shorts #Shortsfeed #lokshahimarathi #maharashtrapolitics #kamleshsutar #politics #kiritsomaiyaviralvideo #lokshahimarathichannel #lokshahiband @kamleshsutar pic.twitter.com/BzeGsb9QBy
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) September 22, 2023
ते पुढे म्हणतात, ‘आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल अशी आशा होती. तपास सुरू असतानाही आपल्याला शिक्षा झाल्यासारखे वाटते. आम्ही कायदेशीर लढा देऊ. आम्हाला अधिक वेळ दिला असता तर ते अधिक न्याय्य वाटले असते. आम्हाला संध्याकाळी 6.13 वाजता नोटीस मिळाली की तुम्ही 7 वाजल्यापासून चॅनल बंद करा. आम्ही लवकरच परत येऊ.’
किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.
कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.#lokshahimarathi pic.twitter.com/xPUJsNZ8lq
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) September 22, 2023
सुतार पुढे म्हणाले, ‘आम्हाला न्यायालयाकडून नवीन आदेश मिळण्याची आशा आहे. लोकशाही आपले काम करत राहील. चौकशी होऊ द्या आणि त्याचे निष्कर्ष बाहेर येऊ द्या. आमच्याविरुद्ध आधीच एफआयआर आहे. लोकशाहीला आम्ही घाबरत नाही कारण ही आमची लोकशाही आहे.’ यासोबत X वरील एका वेगळ्या पोस्टमध्ये, सुतार यांनी I&B मंत्रालयाच्या नोटिसच्या चित्रासह, तोंडावर पांढरी लावलेला स्वतःचा फोटो पोस्ट केला. (हेही वाचा: Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात यावर्षी जुलैपर्यंत 1,555 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांचा धक्कादायक दावा)
कमलेशजी घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत #लोकशाही @kamleshsutar https://t.co/hmV4g4MEil
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 22, 2023
दरम्यान, ‘शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची तुलना आणीबाणीशी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांना पाठिंबा दर्शवला, ते म्हणाले, ‘कमलेशजी काळजी करू नका आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत.’