Cyber Attacks: Intelligence Collection च्या उद्देशाने 100 हाय प्रोफाइल लोकांवर सायबर हल्ला- Microsoft 
मायक्रोस्पॉट (Photo Credits: Pixabay)

महत्वाची माहिती मिळवण्याच्या (Intelligence Collection) उद्देशाने 100 हाय प्रोफाइल व्यक्तिंवर सायबर हल्ला (Cyber Attacks) झाला होता. आता ही सायबर हल्ल्याची मालिका मायक्रोसॉफ्टने (Microsoft) थांबविली आहे. यात हॅकर्सनी (Hackers) माजी राजदूत आणि वरिष्ठ धोरण तज्ञांच्या खात्यांना लक्ष्य केले होते. इराणी हल्लेखोर फॉस्फरसने (Phosphorus) आपल्या हल्ल्यामध्ये सौदी अरेबियामध्ये आगामी म्यूनिच सुरक्षा परिषद आणि थिंक 20 (T 20) शिखर परिषदेच्या संभाव्य सहभागींना लक्ष्य केले. म्यूनिच सुरक्षा परिषद ही सुरक्षा विषयांबाबत राज्य प्रमुख आणि इतर जागतिक नेत्यांसाठी सर्वात महत्वाची बैठक आहे. जवळपास 60 वर्षांपासून ही बैठक सतत होत आहे. त्याचप्रमाणे जी 20 देशांसाठी धोरणात्मक कल्पना तयार करणारा थिंक 20 हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे.

मायक्रोसॉफ्टमधील कस्टर सिक्युरिटी अँड ट्रस्टचे उपाध्यक्ष टॉम बर्ट म्हणाले की, ‘सध्याच्या विश्लेषणाच्या आधारे आम्हाला असे वाटत नाही की हॅकर्सकडून घडलेली ही घटना अमेरिकन निवडणुकीशी संबंधित आहे.’ हल्लेखोर संभाव्य अतिथींना ईमेलमार्फत या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी बनावट मेल पाठवत होते. हे ईमेल इंग्रजीत होते आणि ते माजी सरकारी अधिकारी, धोरण तज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि अशासकीय संस्थांच्या नेत्यांना पाठविण्यात आले होते. (हेही वाचा: PUBG Livik & Mobile Lite Game भारतात आजपासून मोबाईल युजर्ससाठी होणार बंद, Tencent कंपनीने दिली माहिती)

बर्ट यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘आमचा विश्वास आहे की हे हल्ले काही महत्वाची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने घडले आहेत. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये माजी राजदूत आणि इतर ज्येष्ठ धोरण तज्ज्ञ समाविष्ट होते जे जागतिक एजेन्डा तयार करण्यात आणि आपापल्या देशात परराष्ट्र धोरण आखण्यास मदत करतात.’ मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजंस सेंटर किंवा एमएसटीआयसीद्वारे ही क्रिया उघडकीस आली. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे व्यवसाय आणि वैयक्तिक ईमेल खात्यांना मल्टी फॅक्टर प्रमाणीकरण लागू केल्यास अशा हल्ल्यांना यशस्वीरित्या प्रतिबंध केला जाईल.