Zomato Logo (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या संकटाकाळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी परवानगी दिली असून कोरोनासंबंधित सर्वोतोपरी काळजी हॉटेल मालक ते डिलिव्हरी बॉयने घ्यावी अशा सुचना दिल्या आहेत. परंतु ऑनलाईन पद्धतीने सेवा देणारी कंपनी झोमॅटो (Zomato) यांनी शुक्रवारी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या कारणास्तव जवळजवळ 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीत 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. झोमॅटोचे संस्थाक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसायाचे अनेक पैलू बदलले आहेत आणि यातील बरेच बदल कायमस्वरुपी होणार आहेत.

दीपिंदर गोयल यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, आमच्या कर्मचाऱ्यांना पर्याप्त काम मिळेल अशी आशा वाटत नाही. त्यामुळेच 13 टक्के कर्मचाऱ्यांचे कपात करणार आहोत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कपात करण्यात येणार आहे त्यांना 24 तासाच्या आतमध्ये कंपनीच्या नेतृत्व टीमकडून झूम कॉल कडून निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलेले नाही पण त्यांच्यासाठी कंपनीकडे काम नाही आहे अशांना फक्त 50 टक्के पगार देण्यात येणार आहे. गोयल यांनी कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण वेळ आणि पूर्ण उर्जा नवी नोकरी शोधण्यासाठी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनी जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करणार आहे.(COVID-19 Pandemic मध्ये झोमॅटो कंपनीचा मदतीसाठी पुढाकार; भारतातील 3,100 हून रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना तब्बल 2.64 कोटी रुपयांची मदत)

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत झोमॅटो, अॅमेझॉन, डी-मार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, फ्लिपकार्ट यांच्यातर्फे घरपोच किराणा सामानाची डिलिव्हरी दिली जात आहे. नागरिकांच्या सोईसाठी सध्या ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. देशातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.