BSNL 5G Service

सरकारी कंपनी बीएसएनएल आपल्या किमतींमध्ये फार बदल न करता खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना सध्या दिसत आहे. नुकताच बीएसएनएल 5G वरुन पहिला कॉल यशस्वीपणे करण्यात आला असून त्यामुळे बीएसएनएल 5G लाँचिंगच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट आहे. जिओ, एअरटेल, व्हीआय या कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली असून याचा फायदा बीएसएनएल झाल्याचे दिसून आले आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या दरात वाढ केल्यानंतर बीएसएनएलने आपल्या दरात कोणतीच वाढ केली नाही त्यामुळे याचा फायदा बीएसएनएलला झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आपला नंबर बीएसएसएलवर पोर्ट केल्याचे दिसून आले.  (हेही वाचा - BSNL New 395 Day Plan: बीएसएनएलचा नवा प्लॅन, प्रतिदिन मिळणार 2GB हाय-स्पीड डेटा आणि विनामूल्य गेमिंग; वैधता कालावधी, आणि कॉलिंग दर किती? घ्या जाणून)

पाहा पोस्ट -

बीएसएनएलकडून 5G लाँचच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच बीएसएनएल ही 5G मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्याशी स्पर्धा करेल असं चित्र आहे. केंद्रीय टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बीएसएनएलच्या सेवेचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबतचे संकेत दिले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बीएसएनएल 5G वरुन एक व्हिडिओ कॉल केला. त्याबाबतचा व्हिडिओ त्यांनी ‘एक्स’ वर शेअर केला.

बीएसएनएलकडून काही भागांमध्ये 4G सेवा देण्यात आली आहे. मात्र अद्याप ती भारतभर नाही. जिओ, एअरटेल यांनी मात्र भारतभर 5G सेवेचा विस्तार केला आहे. बीएसएनएल स्वस्त आहे यात शंकाच नाही, मात्र ग्राहकांना बीएसएनएल वापरताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. कंपनी लवकरच भारतभर दर्जेदार 4G आणि 5G देईल, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.