Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Govt Blocks 232 Foreign Apps: भारत सरकारने पुन्हा एकदा 232 मोबाईल अॅप्स ब्लॉक (App Block) केले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व अॅप्स बेटिंग, जुगार आणि अनाधिकृत कर्ज सेवेमध्ये गुंतलेले होते जे चायनीजसह परदेशी संस्थांद्वारे चालवले जात होते. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार हे अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बेटिंग, जुगार आणि मनी लाँड्रिंगसारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या 138 अॅप्सना ब्लॉक करण्याचा आदेश 4 फेब्रुवारीलाच जारी करण्यात आला होता. मात्र, यासोबतच अनधिकृत कर्ज सेवेत गुंतलेल्या 94 अॅप्सना ब्लॉक करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Chinese App Banned: Baidu Search आणि Weibo अॅप्सवर भारतात बंदी; Google Play Store, App Store वरुन हटवले)

चीनसोबतच इतर अनेक परदेशी संस्थाही हे सर्व अॅप चालवत होत्या. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्स बंद करण्यात आले आहेत. कारण ते देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करत होते. मात्र, सरकारने कोणते 232 अॅप ब्लॉक केले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

गेल्या वर्षी सरकारने चीनसह विविध देशांनी बनवलेले 348 मोबाइल अॅप ब्लॉक केले होते. हे अॅप्स नागरिकांच्या प्रोफाइलिंगसाठी वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठवल्याप्रकरणी दोषी आढळले होते.

याशिवाय, सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये डेटा सुरक्षेच्या कारणास्तव 117 चीनी अॅप्स ब्लॉक केले होते. ब्लॉक केलेल्या अॅप्सच्या या यादीत लोकप्रिय PUBG देखील समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने कॅमस्कॅनरसारखे लोकप्रिय अॅपही ब्लॉक केले आहेत.