BharatPe Takes Legal Action Against Ashneer Grover: भारतपेकडून सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर कायदेशीर कारवाई
Ashneer Grover (PC - Instagram)

BharatPe Takes Legal Action Against Ashneer Grover: भारतपे (BharatPe) ची मूळ कंपनी रेझिलिएंट इनोव्हेशन्सने (Resilient Innovations) सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हरवर (Ashneer Grover) कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे आता ग्रोव्हर यांच्या अडचणी वाढणार आहेत. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात नवीन केस दाखल केली असून कंपनीशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचा दावा करत ती उघड होऊ नये म्हणून मनाई आदेश मागितला आहे. यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त प्रकाशित केलं आहे.

दरम्यान, अशनीर ग्रोव्हरने यांनी भारतपेच्या अलीकडील सिरीज ई फंडिंग फेरीत सामील असलेल्या इक्विटी वाटप आणि दुय्यम घटकांबद्दल सोशल मीडियावर तपशील शेअर केल्यानंतर कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे. टायगर ग्लोबलच्या नेतृत्वाखालील आणि ड्रॅगनियर इन्व्हेस्टर ग्रुपच्या सहभागासह या फंडिंग फेरीने 370 दशलक्ष डॉलर जमा केले. (हेही वाचा ृ-Three-Day Work Week: 'तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य, जीवनाचा उद्देश फक्त नोकरी नाही'- Bill Gates

भारतपेच्या वकिलाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की ग्रोव्हरच्या कृतीने त्याच्या रोजगार करारामध्ये नमूद केलेल्या दायित्वांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी कंपनीबद्दल गोपनीय माहिती उघड केली आहे. ग्रोव्हर यांनी पोस्ट हटवली असताना, भारतपेने असा दावा केला आहे की त्यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीची गोपनीय माहिती त्यांच्याकडे राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगार कराराच्या अटींचे उल्लंघन होत आहे.

न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी नुकत्याच झालेल्या सुनावणीचे अध्यक्षस्थान भूषवले. ज्या दरम्यान ग्रोव्हर यांच्या वकिलाने गोपनीयतेच्या कथित उल्लंघनासाठी त्यांच्या वतीने माफी मागितली. न्यायालयाने माफीनामा स्वीकारला, परंतु ग्रोव्हरने अद्याप गोपनीय माहिती ठेवल्याचा मुद्दा आगामी सुनावणीत हाताळला जाईल, असे ईटीच्या अहवालात नमूद केले आहे.