Battlegrounds Mobile India Pre-registration: बॅटलग्राउंड मोबाईलसाठी प्री-रजिस्ट्रेशनसाठी तारीख जाहीर
Krafton’s Battlegrounds Mobile India New Logo (Photo Credits: Official Website of Battlegrounds Mobile India)

Battlegrounds Mobile India Pre-registration:  पबजी मोबाईलचे भारतात लाखो चाहते असून ते याची खुप वेळ प्रतीक्षा करत आहेत. या लाखो  लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण कंपनीने आता नव्या रुपातील Battlegrounds Mobile India नावाने भारतात पुन्हा एकदा आगमन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दक्षिण कोरियाची गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton ने Battlegrounds Mobile India च्या प्री-रजिस्ट्रेशनच्या तारखेची आता घोषणा केली आहे. त्यानुसार प्री-रजिस्ट्रेशन येत्या 18 मे रोजी गुगल प्ले स्टोअरवर लाइव्ह असणार आहे. गेम कधी लॉन्च होणार याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु प्री-रजिस्ट्रेशन लिंक लाइव्ह झाल्यानंतर तो लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. परंतु iOS वर गेम कधी उपलब्ध करुन दिला जाणार याची सुद्धा माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनीने एका प्रेसच्या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले की, प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना स्पेसिफिक रिवॉर्ड्ससाठी क्लेम करता येणार आहे. हे रिवॉर्ड्स फक्त भारतीय प्लेयर्ससाठी असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या युजर्सला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन प्री-रजिस्ट्र बटणावर क्लिक करावे लागणार आहे. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम केल्यानंतर रिवॉर्ड आपोआप उपलब्ध होणार आहे. पबजी मोबाईल प्रमाणे हा गेम सर्व युजर्सला खेळण्यासाठी फ्री असणार आहे.(PUB G पेक्षा Battlegrounds Mobile India मिळणार धमाकेदार फिचर्स, 18 वर्षाखालील मुलांसाठी असणार 'हे' नियम)

पुढे कंपनीने म्हटले की, यावेळी डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हेसी बद्दल काळजी घेण्यात आली आहे. क्राफ्टनने असे म्हटले की, यावेळी युजर्सचा डेटा देशातच स्टोर केला जाणार आहे. त्याचसोबत लॉ-रेग्युलेशनची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे. कंपनी या गेम नंतर आणखी एक गेम अॅप लॉन्च करणार आहे. जो सध्या भारतात उपलब्ध नाही आहे.

गेम डेव्हलपर्स क्राफ्टन यांच्या मते 18 वर्षाखालील मुलांना या गेमसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी त्यांना पालकांकडून परवानगी घेण्यासत त्यांना मोबाईल क्रमांक सुद्धा द्यावा लागणार आहे. त्यामुळे ते गेम खेळण्यास योग्य आहेत की नाही समजणार आहे.