दमदार फिचर्ससह लाँच झाला Asus ZenFone 6, काय आहे ह्याची किंमत
Asus Zenfone 6 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन जगतातील नामांकित कंपनी आसूसने आपल्या सीरिजचा एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. स्पेनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आसूस कंपनीने आपला नवा स्मार्टफोन आसूस झेनफोन 6(Asus ZenFone 6) हा स्मार्टफोन लाँच केला. हा झेनफोन 5Z (ZenFone 5Z) चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. ह्या कंपनीचा हा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात रोटेटिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोनने ड्यूल कॅमेरासह रोटेट होऊन सेल्फीसुद्धा काढू शकतो. ह्या कंपनीने ह्या स्मार्टफोनचे बेजल्स कमी करण्यासाठी आणि ऑल स्क्रीन फ्रंट पॅनल बनविण्यासाठी ह्यात एक फ्लिप कॅमेरा बनविला आहे.

आसूस कंपनीने आसूस झेनफोन 6 तीन प्रकारांत लाँच केला आहे. ज्यात अनुक्रमे 6GB+64GB, 6GB+128GB, 8GB+256GB अशा प्रकारांत उपलब्ध केला आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाईल, ह्याबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कंपनीने हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि ट्विलाइट सिल्वर रंगात उपलब्ध होईल.

काय असेल ह्या स्मार्टफोनची किंमत:

आसूस झेनफोन 6 च्या 6GB+64GB ची किंमत युरो 499 म्हणजेच जवळपास 39,100 रुपये इतकी असेल. तर 6GB+128GB स्मार्टफोनची किंमत युरो 559 म्हणजेच 43,800 रुपये तर 8GB+256GB स्मार्टफोनची किंमत युरो 599 म्हणजेच 47,000 रुपये इतकी असेल.

आसूस झेनफोन 6 ची खास वैशिष्ट्ये:

ह्या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाची फुल एचडी डिस्प्ले (1080x2340p)ची IPS स्क्रीन दिली गेली आहे. हा फोन ड्यूल नॅनो सिम ला सपोर्ट करतो आणि अॅनड्रॉईड आर (Android R) ला सपोर्ट करतो. ह्यात Adreno 640 GPU सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिले गेले आहे.

रोटेटिंग कॅमे-याची वैशिष्ट्ये:

ह्यात ड्यूल कॅमेरा सेटअप सह दिला गेला आहे. ह्यात 48MP प्रायमरी कॅमेरा ड्यूल एलईडी फ्लॅशसह आणि सेकेंडरी कॅमेरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल फीचर्ससह दिला गेला आहे. ह्यात क्विक चार्ज 4.0 सपोर्टसह 5000mAh बॅटरी सह दिला गेला आहे.

sus Zenfone 6 लवकरच लॉन्च होणार, ग्राहकांना मिळणार दमदार फिचर्स

त्याशिवाय ह्याच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाले तर, ह्यात USB टाइप-C, NFC, Wi-Fi 802 llac-Wi-Fi 5, ब्लूटुथ 5.0 आणि GPS सपोर्टसुद्धा दिला गेला आहे. ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, 256GB (UFS 2.1) इतकी आहे, ज्याला मेमरी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.