Asus Zenfone 6 (Photo Credits-Twitter)

Asus कंपनी लवकरच आपले नवे मॉडेल असणारा Asus Zenfone 6 येत्या 16 मे रोजी लॉन्च करणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये नॉच डिस्प्ले देण्यात आलेला नाही. रिपोर्ट्सनुसार. स्मार्टफोनमध्ये डुअल स्लाइडर डिझाइन देण्यात आले आहे. डुअल फ्रंट आणि रियर कॅमेरा झेनफोन 6 साठी देण्यात आला आहे.

गुरुवारी असुस कंपनीने या स्मार्टफोनचा टीझर झळकवला आहे. मात्र अद्याप कोणत्याही फिचर्सबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 16 मे रोजी स्पेनमधील वेलेंसिया येथे लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असणार आहे.(Amazon Summer Sale 2019: कमी किंमतीत उत्तम फिचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, जाणून घ्या ऑफर्स)

झेनफोन 6 Full HD Display मध्ये असणार आहे. तसेच 5 वेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे म्हटले जात आहे.