Asus ZenBook Duo 14 (Photo Credits: Twitter)

टेक्नॉलॉजी जगतात अगदी कमी काळात अनेकांचे मन जिंकणारी आसूस कंपनी ने (ASUS) आपले दोन जबरदस्त लॅपटॉप्स (Laptops) भारतात लाँच केले आहे. Asus ZenBook Duo 14 आणि Asus ZenBook Duo Pro 15 अशी या दोन लॅपटॉप्सची नावे आहेत. हे लॅपटॉप्स भारतीय बाजारात असलेल्या अन्य कंपन्यांच्या लॅपटॉप्सला तगडी टक्कर देतील. या लॅपटॉप्समध्ये कूलिंग आणि व्ह्यूइंग चा जबरदस्त अनुभव मिळेल. या दोन्ही लॅपटॉप्समध्ये सेकेंडरी स्क्रिनपॅड प्लस टच डिस्प्ले मिळेल. यांचे दोन्ही लॅपटॉप्सचे डिझाईन खूपच जबरदस्त आणि हटके आहे.

ZenBook Duo 14 बेस वेरियंटची सुरुवाती किंमत 99,990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप तुम्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट शिवाय आसूसच्या एक्सक्लूसिव ऑफलाईन स्टोरवर सुद्धा खरेदी करु शकता. तसेच ZenBook Duo Pro 15 ची सुरुवाती किंमत 2,39,990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप तुम्ही 15 मे नंतर खरेदी करु शकता.हेदेखील वाचा- Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल Flipkart वर आज दुपारी 12 पासून सुरु; जाणून घ्या ऑफर्स

ASUS ZenBook Duo 14 लॅपटॉपची वैशिष्ट्ये

हा लॅपटॉप स्लिम डिझाईनसह येतो. यात 14 इंचाची मेन डिस्प्ले मिळते. त्याशिवाय याचा टच पॅड असलेला डिस्प्ले 12.65 इंचाचा आहे. यात 11th Gen Intel Core i7 पर्यंत प्रोसेर आणि Iris Xe ग्राफिक्स मिळते. हा लॅपटॉप Nvidia GeFore MX450 ग्राफिक्स कार्डसह येतो. याचा सेकेंडरी डिस्प्ले 7 अंशापर्यंत फिरू शकतो. यात 16GB चा DDR4 RAM आणि 1TB चा SSD स्टोरेज मिळतो. याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर यात Wi-Fi 6, ब्लूटुथ 5.0 सारखे फिचर्स मिळतात. कंपनीचा दावा आहे की, हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 17 तास वापरू शकतो.

ASUS ZenBook Pro Duo 15 लॅपटॉपची वैशिष्ट्ये

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4K रेजोल्युशन असलेली डिस्प्ले दिली आहे. त्याशिवाय यात 14.1 इंचाचा स्क्रिन पॅडसुद्धा दिला आहे. हा लॅपटॉप 32GB DDR4 RAM आणि 1TB SSD स्टोरेजसह येतो. हा एक प्रोफेशनल लॅपटॉप आहे. यात 10th Gen Intel Core i9 प्रोसेसर दिला गेला आहे. यात Nvidia RTX 370 ग्राफिक्स कार्ड दिले गेले आहे आणि हे कार्ड 8GB व्हिडिओ मेमरीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6, ब्लूटुथ 5.0 सारखे फिचर्स मिळतात. हा लॅपटॉप 92Wh लिथियम पॉलिमेर बॅटरीसह येतो.