Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल Flipkart वर आज दुपारी 12 पासून सुरु; जाणून घ्या ऑफर्स
Asus ROG Phone 5 (Photo Credits: Asus India)

Asus ROG Phone 5 स्मार्टफोनचा सेल आज भारतात सुरु होणार आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून हा गेमिंग स्मार्टफोन फ्लिपकार्ट (Flipkart) वर उपलब्ध होईल. मागील महिन्यात झालेल्या असूस आरोजी फोन 5 सिरीजमध्ये हा फोन लॉन्च झाला आहे. या सेलअंतर्गत फ्लिपकार्ट अक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास युजर्संना 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळणार आहे. यासोबतच 5999 रुपयांना गुगलचे नेस्ट हब सेलमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच टीव्ही, लॅपटॉप, एसी आणि इतर मोबाईल्सवर देखील सूट मिळेल.

Asus ROG Phone 5 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 57,999 रुपये इतकी आहे. (Asus ROG Phone 5 च्या खरेदीपूर्वी जाणून घ्या फिचर्स, किंमत)

ASUS India Tweet:

या गेमिंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला असून अॅडरेनो 660 जीपीयू देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 6.78 इंचाचा FHD+AMOLED डिस्प्ले 2448x1080 पिक्सल रिज्योल्यूशनसोबत देण्यात आला आहे. यासोबतच 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये ट्रिपर रियल कॅमेरा दिला असून 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा Sony IMX686 सेन्सरसोबत देण्यात आला आहे. यासोबत 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीज आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

 

या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी दिली असून 65W चा फास्ट चार्गिंग सपोर्ट देखील दिला आहे. यामध्ये गेमकूल 5, AirTrigger 5 हे थर्मल डिझाईन दिले असून ड्युएल फ्रंट स्पीकर्स देण्यात आले आहेत. यासोबतच मल्टी एंटिना वायफाय आणि क्वॉड माईक नॉईज कॅन्सलेशन देखील दिले आहे. हा मोबाईल अॅनरॉईड 11 वर आधारित आरोजी यूआय ऑपरेटिंग स्टिटमवर काम करतो. हा स्मार्टफोन पॅनथम ब्लॅक या शेडमध्ये उपलब्ध असेल.