Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल 15 एप्रिलला; खरेदीपूर्वी जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑफर्स
Asus ROG Phone 5 (Photo Credits: Asus India)

Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल 15 एप्रिल 2021 रोजी आहे. या गेमिंग स्मार्टफोनच्या सेलची घोषणा Asus India च्या अधिकृत वेबसाईटवरुन करण्यात आली आहे. सेल दरम्यान हा स्मार्टफोन  Asus India च्या अधिकृत वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता या सेलला सुरुवात होईल. या सेलअंतर्गत गेमिंग स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसंच 6000 ते 16500 रुपयांपर्यंतची सूट एक्सचेंज ऑफर्सच्या माध्यमातून मिळेल. त्याचबरोबर नो-कॉस्ट ईएमआय आणि स्डँडर्ट ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे. तसंच निवडक टीव्ही, लॅपटॉप, एसी आणि मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Google Nest Hub केवळ 5999 रुपयांत मिळेल.

Asus ROG Phone 5 गेल्या महिन्यात Asus ROG Phone 5 Series अंतर्गत भारतात लॉन्च करण्यात आला होता. Asus ROG Phone 5 Series मध्ये  ROG Phone 5, ROG Phone 5 Pro and ROG Phone 5 Ultimate phones यांचा समावेश आहे.

Asus ROG Phone 5 मध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले  2448x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 64MP चा प्रायमरी कॅमेरा सोनी IMX686  सेन्सर सह देण्यात आला आहे. तसंच 13MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 5MP चा मायक्रो स्नॅपर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 24MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ:

(Tecno Spark 7 भारतात लाँच, जाणून घ्या 6000mAh इतकी दमदार बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत)

या हँडसेटमध्ये 6,000mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात G, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, NFC, two USB Type-C ports 4G LTE, Wi-Fi 6 आणि 3.5mm चा हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे. Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनचे 8GB + 128GB आणि 12GB + 256GB हे दोन वेरिएंट उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे किंमत 49,999 रुपये आणि 57,999 रुपये इतकी आहे.