Asus ने भारतात लॉन्च केले आपले Online स्टोर, स्मार्टफोन ते लॅपटॉपच्या खरेदीवर मिळणार धमाकेदार बेनिफिट्स
Zenbook Pro Duo (Photo Credits-Twitter)

Asus ने अधिकृतरित्या भारतात आपले नवे ऑनलाईन स्टोर लॉन्च केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना थेट असुसच्या ऑनलाईन स्टोरमधून खरेदी करता येणार आहे.  नव्या डिजिटल स्टोरच्या उद्देशाने ग्राहकांना उत्तम बेनिफिट्स आणि ब्रँन्ड संबंधित अधिक माहिती देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तायवानची टेक दिग्गज कंपनीचे असे म्हणणे आहे की, असुसचे प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी नवे Asus e-Store आता उपलब्ध असणार आहे. यामध्ये स्मार्टफोन ते लॅपटॉपसारख्या प्रोडक्ट्सवर धमाकेदार बेनिफिट्स सुद्धा खरेदीवर मिळणार आहेत. या व्यतिरिक्त कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची खरेदी सुद्धा तुम्हाला या स्टोरच्या माध्यमातून करता येणार आहे.

या ई-स्टोरवर असुस आरओजी पोर्टफोलियोच्या प्रोडक्ट्सचा सुद्धा समावेश असणार आहे, सुरुवात करण्यासाठी ई-सोर मध्ये ROG Phone 5 आणि ROG Phone 3on उपलब्ध असणार आहे. तसेच खरेदी करण्यासाठी विविध सुविधा सुद्धा दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑनलाईन स्टोरवर पेमेंट ऑप्शन e-payment, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, डिजिटल वॉलेटचा वापर करता येणार आहे.(लॉन्चिंगपूर्वी Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या स्मार्टफोनच्या प्रत्येक अपडेट बद्दल अधिक)

Tweet:

तसेच ज्या ऑर्डरच्या डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या साइन ऑफची गरज भासणार नाही आहे.  त्यांना आधीच एक नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. असुसचे ई-स्टोर हे भारतात जवळजवळ 30 हजार पिन कोड क्षेत्रात सेवा देणार आहे. मोफत डिलिव्हरी, करंट प्रोमो ऑफर, 220+ सेवा स्थानकांवर कॉल सेंटर सपोर्ट, MyAccount च्या माध्यमातून रियल टाइमच्या वेळच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाऊ शकते अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.