Apple’s Next CEO: ॲपलचे सीईओ Tim Cook लवकरच निवृत्त होण्याची शक्यता; John Ternus ला मिळू शकते कंपनीची कमान
Apple's Next CEO, John Ternus, Tim Cook Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons, Official Website)

Apple’s Next CEO: टेक जायंट ॲपल (Apple) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक (Tim Cook) यांचा 64 वा वाढदिवस जवळ आला आहे, जे सहसा सेवानिवृत्तीचे वय असते. कुक लवकरच कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याची चर्चा सध्या सुरू आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, जॉन टर्नेस (John Ternus) हे कंपनीचे पुढील सीईओ होण्यासाठी आघाडीवर आहेत. टर्नेस हे 23 वर्षांहून अधिक काळ ॲपल कंपनीमध्ये आहेत आणि सध्या ते कंपनीचे हार्डवेअर अभियांत्रिकीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते थेट कुक यांना रिपोर्ट करतात.

आयफोन, आयपॅड आणि एअरपॉड्ससह कंपनीच्या इतर अनेक उत्पादनांना आकार देण्यात टर्नेस यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. ऍपल कॉम्प्युटर (मॅक) मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स बनवण्याच्या कामातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, टर्नेस यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रवेश घेतला, तेथून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. ॲपलमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी व्हर्च्युअल रिसर्च सिस्टममध्ये मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून काम केले. ॲपलच्या पुढील सीईओ पदासाठी इतर संभाव्य उमेदवारांमध्ये क्रेग फेडेरिघी, डॅन रिचिओ, डेयर्डे ओ'ब्रायन आणि फिल शिलर यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये जॉन टर्नेस आघाडीवर आहेत. (हेही वाचा: Mighty Kingdom layoffs: ऑस्ट्रेलियन व्हिडिओ गेम डेव्हलपर कंपनीत टाळेबंदी; पुनर्रचनेत 28% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा)

दरम्यान, टिम कुक 2011 मध्ये ॲपलचे सीईओ बनले होते. याआधी स्टीव्ह जॉब्स ॲपलच्या सीईओ पदावर होते. टीम कुकला सीईओ पद मिळाल्यानंतर, कंपनीला बहु-ट्रिलियन डॉलर्सची मोठी कंपनी बनण्यास मदत झाली. आता 1 नोव्हेंबर 2024 रोजी टीम कुक 64 वर्षांचे होतील. त्यानंतर ते निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.