Apple चा येत्या 13 ऑक्टोंबरला होणार मेगा इवेंट, MacBook Pro सह 'हे' प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता
Apple Mega Event (Photo Credits-Twitter)

Apple कडून आपल्या यंदाच्या वर्षातील दुसऱ्या मेगा इवेंट Unleashed ची घोषणा केली आहे. हा इवेंट येत्या 18 ऑक्टोंबरला होणर आहे. यामध्ये नव्या चिपसेटसह MacBook Pro आणि Mac Mini च्या नव्या मॉडलचे लॉन्चिंग केले जाऊ शकते. तसेच AirPods3 सुद्धा ग्लोबल मार्केटमध्ये उतरवले जाऊ शकतात. तर गेल्या महिन्यातच अॅप्पलने एक मेगा इवेंट केला होता त्यामध्ये आयपॅड मिनीसह iPhone 13 ची सीरिज ही लॉन्च केली होती.(iPhone युजर्सला दिलासा, आता कोणत्याही फ्रॉड अॅक्टिव्हिटीचे रिपोर्ट करणार होणे सोप्पे)

अॅप्पलच्या या दुसऱ्या मेगा इवेंट बद्दल कंपनीने अधिकृत ट्विट केले आहे. याच्या टीझरमध्ये अॅप्पलचा लोगो झळकावण्यात आला आहे. याचे डिझाइन हॉलिवूडमधील साईफाई सिनेमाप्रमाणे आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅप्पलकडून 14 आणि 16 इंचाचा मॅकबुक प्रो लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये M1X चिपचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच लॅपटॉपमध्ये मॅगसेव सारख्या फिचर्स ही दिले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त Mac Mini सुद्धा लॉन्च केला जाऊ शकतो.(Flipkart Big Diwali Sale: यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून; पहा बॅंक ऑफर्स ते Mobiles, TV वर कशा असतील ऑफर्स)

Tweet:

तसेच अॅप्पलकडून AirPods 3 सुद्धा लॉन्च केले जाऊ शकतात. याच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास,  यामध्ये 3rd जनरेशनची चिपसेट दिली जाऊ शकते. या इअरबड्समध्ये नॉइस कॅन्सिलेशनच्या फिचरचा सपोर्ट दिला जाईल. तसेच टच कंट्रोल ही मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला MacOS, Monterey सुद्धा रोलआउट केले जाऊ शकतात.