अ‍ॅन्ड्रॉइड युजर्सना लवकरच Apple सारखे फिचर्स स्मार्टफोनमध्ये मिळणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

स्मार्टफोन बनवणारी चीनची कंपनी त्यांच्या युजर्ससाठी लवकरच अॅपल सारखे फिचर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करुन देणार आहे. विवो, शाओमी, ओप्पो यासारख्या स्मार्टफोनमध्ये एखादी फाइल ट्रान्सफर करण्यासाठी फास्ट मोड घेऊन येण्यावर सध्या काम सुरु आहे. यासाठी तीन कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. गेल्या वर्षात या तीन कंपन्यांनी या गोष्टीची घोषणा केली होती. त्यावेळीच 'Inter-Transfer Alliance Group’ वेंचर आणण्यावर काम करत आहे.

या वेंचरचा हिस्सा होण्यासोबत शाओमी, ओप्पो, वीवो ‘Peer-to-Peer Transmission Alliance’ चा हिस्सा असणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये अॅपल सारखे फिचर्स मिळणार आहे. खासकरुन Airdrop सारखे फिचर असू शकणार आहे. गेल्या काही काळापासून बीटा टेस्टिंगनंतर अशा पद्धतीचा फास्ट फाइल ट्रान्सफर टेक्नॉलॉजी असणारा स्टेबल वर्जन जागतिक स्तरावर रोलआऊट झाला आहे. या टेक्नॉलॉजी अंतर्गत थर्ड पार्टी अॅपसाठी 20MB/s स्पीडने फाइल ट्रान्सफर करता येणार आहे.(Vivo S1 Pro: किंमतीच्या तुलनेत जबरदस्त कॅमेरा आणि स्टोरेज फिचर देणारा विवोचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच; पाहा याची आकर्षक वैशिष्ट्ये) 

नव्या पद्धतीने आणलेली टेक्नॉलॉजी फास्ट पेअरिंग आणि ट्रान्सफर स्पीडसाठी ब्लूटुथ आणि Wifi P2P च्या कॉम्बिनेशनचा वापर करणार आहे. मात्र यावेळी लक्षात राहू द्या की तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायफाय आणि ब्लुटुथ दोन्ही Enable असणे अनिवार्य आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार फोनमध्ये फेब्रुवारी 2020 पासून हे फिचर्स दिसणार आहे.