WhatsApp (Photo Credit: File/PTI)

WhatsApp हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप जगभर आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. आता या अ‍ॅपमध्ये ग्रुप व्हिडिओ, व्हॉईस कॉलिंग फीचर अपडेट करण्यात आल्याने एका पेक्षा अधिक लोकांशी एकाच वेळी बोलणं सुकर होणार आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Group Video Conferencing Feature सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं आहे. सध्या निम्मं जग लॉकडाऊनमध्ये असल्याने एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी, ख्याली खुशाली विचारण्यासाठी ग्रुप व्हिडिओ कॉल करण्याला अनेक युजर्सनी पसंती दाखवली आहे. यामुळे एकाचवेळी जगाच्या विविध टोकावर असलेल्या तुमच्या प्रियजनांसोबत एकाच वेळी गप्पा मारता येतात. आणि आता हा ग्रुप व्हिडिओ कॉल करणं व्हॉट्सअ‍ॅपने अजूनच सोप्पं केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर पूर्वी ज्या लोकांना तुम्हांला व्हिडिओ कॉलमध्ये घ्यायचं आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये जाऊन तुम्हांला “Add Participant” करावं लागत होतं. मात्र आता ही प्रकिया सोप्पी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता 4 किंवा त्यापेक्षा कमी लोकांसोबत अवघ्या एका क्लिकवर ग्रुप कॉल करता येणार आहे. असे ट्वीट व्हॉट्सअ‍ॅपने केले आहे.

नव्याने आलेलं Group Chatting Feature कसं वापराल?

  • व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा ग्रुप बनवा. यामध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी लोकांचा समावेश असला पाहिजे.
  • ग्रुप चॅट विंडोमध्ये तुम्हांला video calling icon दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर ग्रुपमधील लोकांना थेट कॉल लागेल.
  • सध्या हे फीचर कमाल 4 लोकांपुरता मर्यादीत ठेवण्यात आलं आहे.

Android आणि iOS युजर्स दोन्हीसाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस संकटामध्ये आता फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने काही बंधनं घातली आहेत. आता फॉर्वर्ड केलेल्या मेसेजला देखील फॉर्वर्ड करण्याचं प्रमाण कमी करण्याचा व्हॉट्सअ‍ॅपचा विचार असल्याचे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत.