Amazon Prime Day 2019 (संग्रहित-संपादित प्रतिमा)

ई-कॉमर्स कंपनी Amazon ने मंगळवारी एका मोठ्या आणि महत्वाच्या सेलची घोषणा केली आहे. Amazon ने 15-16 जुलै रोजी प्राइम डे (Amazon Prime Day) ची घोषणा केली आहे. या दोन दिवसांत कंपनी एक विशेष सेल चालवणार आहे. या सेलला लाभ फक्त प्राइम सदस्य घेऊन शकणार आहेत. या सेलमध्ये सदस्यांसाठी तब्बल 1000 हून अधिक उत्पादने सादर केली जाणार आहेत. भारतात या सेलचे हे तिसरे वर्ष असून, संपूर्ण जगात पाचव्हायांदा सेल आयोजित केला जाणार आहे. 15 जुलै रात्री 3 वाजता हा सेल सुरु होईल.

यात सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दैनंदिन वापराच्या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंवर ग्राहक 50 टक्क्यांपर्यंत सूट प्राप्त करू शकतात. या सेल दरम्यान एचडीएफसी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट वर 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. शिवाय कंपनी आपल्या Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डवर अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत. काही उत्पादनांवर विनाव्याज ईएमआयची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, सध्या भारतासह 18 देशांमध्ये प्राइमचे 10 कोटी सदस्य आहेत. प्राइम नाऊ या सेवेअंतर्गत बंगळूरू, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांत ग्राहकांना अवघ्या दोन तासांत सामानाची डिलिव्हरी पोहचवली जाते. या बाबत बोलताना, Amazon इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर, अमित अग्रवाल म्हणाले, 'प्राइम सदस्यांसाठी हा आमचा सर्वात मोठा सेल असणार आहे. हा सेल मागच्या वर्षी पेक्षा मोठा असणार आहे तसेच यात मागच्या वर्षी पेक्षा जास्त गोष्टींचा समावेश असणार आहे.’