Amazon Layoffs: ॲमेझॉन पुन्हा एका शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार; 'या' विभागाला बसणार फटका
Amazon (PC - Pixabay)

Amazon Layoffs: ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon) या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने नोकर कपातीची घोषणा केली आहे. ॲमेझॉन आपली क्लाउड कंप्युटिंग शाखा Amazon Web Services (AWS) मधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. ॲमेझॉन त्यांच्या पुनर्रचना योजनेवर काम करत आहे आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. या छाटणीमुळे प्रभावित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनी मदत पॅकेज देईल.

अहवालानुसार, AWS ची महत्त्वपूर्ण पुनर्रचना होत आहे, ज्यामुळे त्याच्या भौतिक स्टोअर तंत्रज्ञान, विक्री आणि विपणन विभागांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहेत. कंपनीत सध्या हजारो पदे रिक्त असल्याने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत संधी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही AWS ने सांगितले.

GeekWire च्या अहवालानुसार, कंपनीने सांगितले की ते ती कर्मचाऱ्यांची भरती करणे सुरू ठेवेल. गेल्या वर्षी, ॲमेझॉनने खर्च कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या वर्षीही कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे सुरूच ठेवले आहे. कंपनीने प्राइम व्हिडिओ डिव्हिजन, एमजीएम स्टुडिओ आणि बाय विथ प्राइम डिव्हिजनमधील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याशिवाय ॲमेझॉनच्या मालकीची गेमिंग कंपनी Twitch ने देखील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. (हेही वाचा: TCS Begins Freshers' Hiring: जॉब अलर्ट! टीसीएसमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरभरती सुरु; 10 एप्रिलपर्यंत करू शकाल अर्ज, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात 2024 मध्येही नोकर कपातीचा टप्पा सुरू आहे. आर्थिक आघाडीवर सततच्या आव्हानांमुळे, आयटी क्षेत्रातील जवळजवळ सर्व कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यातच 5 मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे.