TCS Freshers' Hiring: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) ने आयटी फ्रेशर्ससाठी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. टाटा ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या श्रेणीत मोडणारी कंपनी आहे. सध्या टीसीएसमध्ये एकूण 6.14 लाख कर्मचारी आहेत. याशिवाय कंपनीमध्ये अनेक हजार पदांवर रिक्त जागा आहेत. आता कंपनी साधारण 40 हजार नोकऱ्या नवीन किंवा फ्रेशर तरुणांना देणार आहे. ज्यामध्ये टीसीएस विद्यापीठ प्लेसमेंट सेल अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करेल. टीसीएसचे सीईओ गणपति सुब्रमण्यम म्हणाले की, त्यांची कंपनी दरवर्षी चाळीस हजार फ्रेशर्सची भरती करण्यासाठी सतत काम करत आहे.
देशात आयटी क्षेत्रात चांगली रिकव्हरी नसताना टीसीएसने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे आयटी क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीने कोणत्याही नोकरभरतीसाठी थेट नकार दिला आहे. इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी एका निवेदनात सांगितले की, गेल्या वर्षी त्यांनी कॅम्पस सिलेक्शन अंतर्गत कंपनीसाठी पन्नास हजार फ्रेशर्सना पुन्हा नियुक्त केले होते. पण सध्या ते कंपनीला स्टाफची आवश्यकता असल्याशिवाय अशी कोणतीही भरती करणार नाहीत.
टीसीएसने सांगितले की, कोविड -19 साथीच्या आजारामुळे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम काम सुरू केले होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे ठीक आहे, त्यामुळे कंपनीने घरून काम करण्याची सुविधा बंद केली आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता होणाऱ्या भरती अंतर्गत निवडा झालेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येणे क्रमप्राप्त आहे. (हेही वाचा: Cybersecurity Risks: भारतातील केवळ 4 टक्के कंपन्या सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज- Cisco)
दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बीटेक, बीई, एमसीए, एमएससी आणि एमएस विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणार आहे. या नोकरीसाठी 11 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देखील उपलब्ध असेल. नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे आणि अर्जदारांना 26 एप्रिल रोजी परीक्षा द्यावी लागेल. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया टीसीएसच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. TCS व्यवस्थापनाने म्हटले आहे की 2024-25 या आर्थिक वर्षासाठी फ्रेशर्सची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि कंपनी सध्या महाविद्यालयांना भेट देत आहे.