Airtel युजर्ससाठी खुशखबर! कंपनीकडून मोफत 6 GB का डेटा, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी
Airtel (Photo Credits: File Photo)

रिलायन्स जिओची भारतीय बाजारात एन्ट्री झाल्यानंतर अन्य टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार चुरस लागली आहे. आपल्या ग्राहकांना धरून ठेवण्यासोबत अधिकाधिक नव्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या बाजारात नवनवे प्लान्स आणत आहेत. त्यातच आता एअरटेल (Airtel) कंपनीने आपल्या युजर्ससाठी जबरदस्त प्लान आणला आहे. ज्यात ग्राहकांना 6GB चा मोफत डेटा मिळणार आहे. हा प्लान एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी (Prepaid Customer) आहे. आपल्या प्रीपेड ग्राहकांना कंपनी 6GB डेटाचे (6GB Free Internet Data) कूपन देणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

ही ऑफर एअरटेल ग्राहकांसाठी खास ठेवण्यात आली आहे. ही एक अॅप एक्सक्लुसिव्ह ऑफर असल्यामुळे ग्राहकांना कूपन मिळवण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे रिचार्ज करावे लागणार आहे. ही ऑफर पात्र यूजर्सला मिलणार आहे. त्याची माहिती संबंधित ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल.हेदेखील वाचा- Reliance Jio चा नवा प्रीपेड प्लॅन; 125 रुपयांत महिनाभर मिळवा अनलिमिटेड कॉल सह हाय-स्पीड डेटा

काय असतील महत्त्वाच्या अटी

  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे किमान 291 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज (Minimum Prepaid Recharge) करावा लागेल.
  •  एयरटेल 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 289 रुपये, 299 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये आणि 448 रुपयांच्या रिचार्जवर 1GB डेटाचे दोन कूपन देईल. हे फ्री डेटा कूपन 28 दिवसांसाठी वैध असेल.
  •  ग्राहकांना 1GB डेटाचे चार कूपन मिळवण्यासाठी 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्जसह त्यांच्या प्रिपेड नंबरवर रिचार्ज करावा लागेल. हे कूपन 56 दिवसांसाठी वैध असतील.
  • 598 रुपये आणि 698 रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनमध्ये (Prepaid recharge plan) प्रत्येकी 1GB (84 दिवसांसाठी वैध) चे एकूण 6 कूपन दिले जातील.

हे 6GB चे कूपन मिळविण्याची काय कराल?

1. तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर एअरटेल थँक्स अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

2. थँक्स अॅपवर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.

3. आता तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. तसेच या अॅपला तुमच्या कॉल आणि मेसेजेसचा अॅक्सेस द्यावा लागेल.

4. त्यानंतर अॅपवरील माय कूपन सेक्शनवर क्लिक करा. ऑफर क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोड लिहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ऑफर मिळेल.

थोडक्यात या ऑफरमध्ये काही ठराविक ग्राहकांना 6GB डेटा मोफत मिळणार आहे. मात्र ही ऑफर सिलेक्टेट युजर्ससाठीच असणार याची नोंद घ्यावी.