Airtel च्या पोस्टपेड युजर्सचा  4G speed वाढणार; कस्टमर्ससाठी हा नवा प्लॅन
Airtel posters. (Photo Credit: PTI)

एअरटेल (Airtel) या कंपनीने नुकतीच Platinum postpaid युजर्सना 4G speed मध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवार (6 जुलै) दिवशी याबाबत माहिती देताना “Priority of 4G Network” प्लॅन जाहीर करत एअरटेल ग्राहकांना खूषखबर दिली आहे. एअरटेलचे जे ग्राहक Rs 499 चा प्लॅन किंवा त्यापेक्षा अधिकचा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करून घेणार आहेत त्यांना Platinum Users असं संबोधलं जाणार आहे. दरम्यान त्यांना एक्सक्लुझिव्ह बेनिफिट्स दिले जातील. Airtel Thanks app वर देखील कस्टमाईज्ड Platinum UI असेल.

इंटरनेटचा वेग वाढवण्यासोबतच या प्लॅटिनम युजर्सना रेड कार्पेट कस्टमर केअर मिळेल. त्याच्या अंतर्गत कॉल सेंटर आणि रिटेल स्टोअर मध्ये त्यांना स्पेशल सर्व्हिस मिळेल. सार्‍या सर्व्हिस सेंटरमध्ये या ग्राहकांसाठी खास प्रतिनिधी मदतीसाठी सज्ज असतील. यामुळे त्यांना ताटकळत बसावं लागणार नाही. त्यांचा प्रतिक्षेचा वेळ कमी केला जाणार आहे.

Airtel Thanks program अंतर्गत आता एअरटेल ग्राहकांची विभागणी केली जाईल आणि युजर्सना सामान्य सेवेपेक्षा थोडं 'अधिक' देण्याचा आमचा प्रयत्न राहील. यामध्ये 4जी स्पीड वाढवण्यासोबतच आता 28 मिलियन युजर्सना देखील सारख्याच पॅशनने पाहिलं जाणार आहे.

तुम्ही जर पोस्ट पेड युजर्स असाल आणि तुम्ही Platinum postpaid plan वर नसाल तर तो अपग्रेड करून घ्या. यासाठी तुम्हांला किमान 499 रूपये मोजावे लागणार आहेत. सध्या कोरोना व्हायरसची स्थिती पाहता आता युजर्सना नवीन कनेक्शन घेण्यासाठी बाहेर पडावं लागणार नाहीत. ‘Priority 4G SIM’अंतर्गत तुम्हांला घरपोच मिळणार आहे.

एअरटेल युजर्सना सध्या Rs 499 च्या प्लॅनन्सपासून सध्या 4 वेगवेगळे पोस्टपेड प्लॅन आहेत. 3G/4G डाटा ऑफ  75GB चा महिन्याभराचा प्लॅन सध्या अनलिमिटेड लोकल आणि एसटिडी कॉल देत आहे. यामध्ये वर्षभरासाठी Amazon Prime subscription मोफत मिळतं. यासोबतच Zee5 चे देखील मोफत सबस्क्रिब्शन आहे. Rs 749 च्या प्लॅनमध्ये   125GB डाटा सोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटिडी कॉल देत आहे. वर्षभरासाठी Amazon Prime subscription मोफत,  Zee5 चे देखील मोफत सबस्क्रिब्शन, एअरटेल स्ट्रिम,  अ‍ॅन्टी व्हायरस कीट याची सोय आहे. याप्रमाणेच Rs 999 आणि  Rs 1599 च्या प्लॅनमध्येही विशेष सोयी सुविधा आहेत.