Airtel. (Photo Credits: Twitter)

भारती एअरटेलने (Bharti Airtel) आजपासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून देशात Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. Airtel 5G Plus दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी या आठ शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. याची घोषणा करताना, कंपनीने सांगितले की, 5G प्लस सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज भासणार नाही. 5G नेटवर्क विद्यमान एअरटेल 4G सिममध्ये वापरता येऊ शकते.

यासोबतच कंपनीने आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून Airtel 5G Plus सेवा लाइव्ह केली आहे. म्हणजेच एअरटेल 5G या आठ शहरांमध्ये वापरता येईल. कंपनीने दावा केला आहे की Airtel 5G Plus मधील वापरकर्ते आता 30 पट वेगाने इंटरनेट वापरू शकतील. भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी Airtel 5G Plus लाँच करताना सांगितले की, आमची 5G सेवा ग्राहकांकडे असलेल्या कोणत्याही 5G हँडसेट आणि विद्यमान सिम कार्डवर काम करेल. ही सेवा पर्यावरणपूरक देखील आहे.

Airtel 5G Plus हे ज्या तंत्रज्ञानावर चालते जे जगातील सर्वात विकसित इकोसिस्टम असल्याचे म्हटले जाते. Airtel 5G Plus सह वापरकर्ते हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, जलद फोटो-व्हीडीओ अपलोड अशा अनेक गोष्टी करू शकतील. Airtel ने दावा केला आहे की 5G Plus सह वापरकर्त्यांना सध्याच्या इंटरनेट स्पीडपेक्षा 20-30 पट जास्त स्पीड मिळेल. (हेही वाचा: कोट्यावधी स्मार्टफोन युजर्सना 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी 2024 पर्यंट पहावी लागणार वाट)

वापरकर्त्यांना कॉलिंग दरम्यान स्पष्ट आवाजासह सुपर फास्ट कॉल कनेक्टची सुविधा देखील मिळेल. एअरटेलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, यात 2 GB डेटा आणि मोफत कॉलिंग सुविधा मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची असेल. त्याच वेळी, 56 दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन 499 रुपयांमध्ये येईल. यात एकूण 6 GB डेटा मिळेल. 365 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त 5G प्लॅन Rs 1,699 मध्ये येईल. एअरटेलच्या 1,699 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा देण्यात आला आहे.