Airtel (Photo Credits: File Photo)

टेलिकम्युनिकेशन (Telecommunication) व्यवसायात जिओची (Jio)  एंट्री झाल्यापासून अन्य कंपन्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या कल्पना बाजारात आणू लागली . अशातच आता काही दिवसांपूर्वी जिओच्या कॉलिंग (Jio Calling Rates)  सुविधेमध्ये बदल करण्यात आल्यानंतर अन्य कंपन्यांसाठी ही पुन्हा बाजारात प्रवेश करण्यासाठी नामी संधी ठरली. कित्येक वर्षांपासून आघाडीवर असणारी कंपनी भारती एअरटेल (Bharati Airtel) तर्फे सुद्धा आता आपल्या ग्राहकांसाठी एक हटके ऑफर आणण्यात आली आहे. एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानसोबत तब्बल 4  लाख रुपयांचे ‘लाइफ इन्शुरन्स कव्हर’ (Life Insurance Cover) मोफत देण्यात येणार आहे. यासाठी एअरटेलने भारती अ‍ॅक्सा जनरल इन्शुरन्स (Bharati Axa General Insurance) कंपनीशी भागीदारी केल्याचे समजते.

एअरटेलच्या 18 ते 54 या वयोगटातील कोणताही ग्राहक या जीवन विमा सुविधेचा लाभ घेऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. सध्या ही योजना केवळ दिल्ली मध्ये लाँच करण्यात आली असली तरी यानंतर कंपनीला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास सर्व राज्यात ही सुविधा देण्यात येईल असेही कंपनीने सांगितले आहे.

Airtel Digital TV, Dish TV, Tata Sky सह नव्या, जुन्या DTH ग्राहकांसाठी आता KYC करणं बंधनकारक; SMS द्वारा मिळणार चॅनल निवडीची सोय

ही योजना तुमच्या नंबर वर सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पडताळणी, किंवा वैद्यकिय तपासणी करण्याची आवश्यकता नसेल. या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानसोबत कंपनी ग्राहकांना दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा पुरविणार आहे. या प्लानमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल्स, दररोज 100 एसएमएस वापरायला मिळतील. 84 दिवस इतकी या प्लानची वैधता असेल. ग्राहकांकडे इन्शुरन्सची हार्ड कॉपी घरी मागवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.