Aditya L1 Surya Mission (PC - Twitter/ANI)

Aditya L1 Surya Mission: चंद्रयान 3 (Chandrayaan-3) च्या यशानंतर भारत आणि इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (ISRO Chief S Somanath) म्हणाले की, याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. सोबतच इस्रो प्रमुखांनी अंतराळ संस्थेच्या पुढे असलेल्या मिशनबद्दलही महत्त्वूपूर्ण माहिती दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना सन मिशन आदित्य एल1 केव्हा प्रक्षेपित केले जाईल असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ते तयार असून लवकरचं लॉन्च होणार आहे. हे मिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित केले जाऊ शकते. (हेही वाचा -Chandrayaan 3 Special Google Doodle: चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर गुगलने खास डूडल शेअर करत केलं भारताचं अभिनंदन!)

सोमनाथ यांनी पुढे बोलताना सांगितले की, लॉन्च केल्यानंतर या वाहनाला त्याच्या गंतव्यस्थानी एल-1 पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतील. आम्ही गगनयानचीही तयारी करत आहोत. आम्ही कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या अखेरीस क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक मिशन सुरू करू. मॅन मिशनपूर्वी आम्ही आणखी अनेक चाचणी मोहिमा करणार आहोत.

सोमनाथ म्हणाले की, अनेक मोहिमेनंतर आम्ही 2025 मध्ये मानव मिशन सुरू करणार आहोत. ज्यामध्ये मानवयुक्त वाहन अंतराळात पाठवले जाईल. चांद्रयान 3 च्या यशानंतर माझ्या मनातील आनंद मी व्यक्त करू शकत नाही. ते म्हणाले की, हे सर्व इस्रोच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे.