Aditya-L1 Mission: पुढील पाच वर्ष 'आदित्य L1' दररोज 1440 फोटो पाठवणार, जाणून घ्या कधी येणार सूर्यावरील पहिला फोटो
Aditya-L1 Mission (PC - Twitter)

Aditya-L1 Mission: चंद्राचे रहस्य उलगडल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सूर्याची रहस्ये जगासमोर उघड करण्याची तयारी केली आहे. आज भारताने आपली पहिली सूर्य मोहीम सुरू केली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आज आपली पहिली सूर्य मोहीम आदित्य-L1 मिशन (Aditya-L1 Mission) लाँच केले आहे. भारताने आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याकडे पहिले मिशन प्रक्षेपित केले. इस्रोच्या म्हणण्यानुसार, हे मिशन आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित करण्यात आले आहे.

चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर काही सेकंदातच चंद्राची अनेक सुंदर छायाचित्रे जगासमोर आली होती. आता लोकांना सूर्याची उत्सुकता लागली आहे. आदित्य L-1 चा पहिला पेलोड, लक्ष्यित कक्षेपर्यंत पोहोचेल आणि दररोज हजाराहून अधिक छायाचित्रे पाठवेल, जे अभ्यासात उपयुक्त ठरेल. सूर्याचा सर्वात जवळचा फोटो कधी समोर येईल, याबद्दल जाणून घेऊयात... (हेही वाचा - Aditya L1 Launched: श्रीहरिकोटा येथून भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण, Watch Video)

आदित्य-एल1 मिशन ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राशी संबंधित अनेक रहस्ये उलगडणार आहे. या मोहिमेवर देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. किंबहुना, या मोहिमेद्वारे, सूर्याचा बाह्य थर कोरोना, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये, सौर वादळांची उत्पत्ती इत्यादी घटकांचा अभ्यास केला जाईल.

याशिवाय अवकाशातील हवामानावर सूर्याच्या हालचालींचा काय परिणाम होईल याचीही माहिती संकलित केली जाणार आहे. भारताने Lagrangian-1 पॉइंटवर आपला उपग्रह ठेवण्यासाठी आदित्य-L1 मिशन सुरू केले आहे. वास्तविक, सौर-पृथ्वी प्रणालीमध्ये एकूण पाच लाँगरेंज पॉइंट्स आहेत, जिथे आदित्य L1 जात आहे. ही कक्षा पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी दूर आहे, जिथे यानाला पोहोचण्यासाठी एकूण 4 महिने लागतील.

VELC पेलोड दर मिनिटाला पाठवणार एक फोटो -

आदित्य L1 चे प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि VELC चे ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. मुथु प्रियाल म्हणाले, पिक्चर चॅनलद्वारे दर मिनिटाला एक चित्र पाठवले जाईल, म्हणजे 24 तासांत सुमारे 1,440 चित्रे प्रसिद्ध केली जातील. या वाहनाच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यात पहिले चित्र समोर येणार आहे.

VELC पेलोड हा आदित्य-L1 वरील सर्वात मोठा आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक पेलोड आहे. IIA अधिकाऱ्यांच्या मते, 190-किलोग्राम VELC पेलोड पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक मिनिटाला एक प्रतिमा पाठवेल. वास्तविक, या उपग्रहाचे आयुष्य पाच वर्षे असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वास्तविक, इंधनाच्या वापराच्या आधारावर याचा अंदाज लावला गेला आहे. परंतु भविष्यात ते कमी-अधिक असू शकते.