Aditya L1 Launched: इस्रोने आपली पहिली सूर्य मोहीम 'आदित्य-एल1' लाँच केली आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 11:50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. ISRO ची पहिली सूर्य मोहीम आदित्य L-1 अंतराळातील 'लॅगरेंज पॉइंट' म्हणजेच L-1 कक्षेत ठेवली जाईल. यानंतर हा उपग्रह 24 तास सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास करेल. L-1 उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)