कोरोना विषाणू संक्रमणा (Coronavirus) पासून वाचण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतु मोबाईल अॅप (Aarogya Setu App) एप्रिलच्या सुरुवातीस लाँच केले. या अॅपमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरस ट्रॅकर म्हणूनही याचा वापर केला जात आहे. अशात या अॅपने एक नवीन विक्रम केला आहे. जगभरात डाउनलोड होणाऱ्या पहिल्या 10 अॅप्समध्ये याचा समावेश झाला आहे. ही माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात लोकांना हे अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते.
अमिताभ कांत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे, ते म्हणतात. ‘आरोग्य सेतु हे अॅप लॉन्च झाल्यानंतर मे महिन्यात सलग दुसर्या महिन्यात ते जगभरातील टॉप 10 डाउनलोड मोबाइल अॅप्सपैकी एक बनले आहे. कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करून जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.’ आरोग्य सेतु हे अॅपखास कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. आरोग्य सेतू अॅपच्याद्वारे आपण कोणत्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहे की नाही. याबाबत माहिती मिळू शकते. याशिवाय या अॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे हे देखील आपण शोधू शकता. (हेही वाचा: चीनच्या विरोधात Campaign केल्याने Amul कंपनीचे ट्वीटर ब्लॉक? वाचा Twitter ने काय दिले स्पष्टीकरण)
अमिताभ कांत ट्वीट -
#AarogyaSetu one of the top 10 downloaded mobile apps globally since launch, second month in running. India has led the way in effectively leveraging technology to combat the COVID-19 pandemic. pic.twitter.com/eVlR0phUBe
— Amitabh Kant (@amitabhk87) June 6, 2020
या यादीमधील Top 10 अॅप्स -
- TikTok
- ZOOM
- Messenger
- Google Meet
- Aarogya Setu
- YouTube
- Snapchat
क्या आप जानते हैं की @SetuAarogya ऐप अब 'KaiOS' प्लेटफॉर्म पर भी उपलब्ध है। सभी #JioPhone ग्राहक अब खुद को और अपने प्रियजनों को #COVID19 से सुरक्षित रखने के लिए #AarogyaSetuApp का उपयोग कर सकते हैं। @GoI_MeitY के @NeGD_GoI टीम ने इस एप्लिकेशन को रिकॉर्ड समय में डेवेलोप किया हैं। pic.twitter.com/LlGEyicLK1
— Ministry of Electronics & IT (@GoI_MeitY) June 7, 2020
आरोग्य सेतु अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्याला कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही, हे आपले स्थान आणि प्रवासाच्या इतिहासाच्या आधारावर हे अॅप आपल्याला सांगेल. गुगल प्ले स्टोअर वरून अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल व यानंतर, भाषा निवडावी लागेल. आता आरोग्य सेतू अॅप हे 'KaiOS' प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध झाले आहे.