Paytm & LPG Cylinder (Photo Credits: File Image)

लॉकडाऊन काळात महागाई इतकी वाढली की सामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. अशा परिस्थिती महागाईचे ओझं थोडसं हलकं कऱण्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीकडून एक जबरदस्त ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. यात तुम्हाला LPG गॅस स्वस्त दरात मिळू शकतो. पेटीएमने (Paytm) एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांसाठी (LPG Customers) ही खास ऑफर आणली आहे.

पेटीएमने ही बंपर ऑफर (Paytm Bumper Offer) सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. भारत पेट्रोलियम आपल्या ट्विटर पेजवरुन याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

ही एक कॅशबॅक ऑफर आहे. पेटीएम ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर (Paytm Cashback Offer) देते आहे. ही ऑफर पहिल्यांदा बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मिळेल. पहिल्यांदा एखाद्या ग्राहकाने App च्या माध्यमातून भारतगॅस बुक केला तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. भारत पेट्रोलियमने देखील या ऑफरबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- Paytm Offer: पेटीएम वापरुन HP, Bharat Gas, Indane घरगुती गॅस सिलिंडर बुक केल्यास 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक

कशाप्रकारे कराल बुक?

-तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएम अॅप नसेल तर सर्वात आधी पेटीएम App डाउनलोड करा

-पेटीएम अॅपमध्ये recharge and pay bills' मध्ये जा

हे वाचा-Gold Price: सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, आज या दराने होतेय सोनेविक्री

-त्यानंतर 'book a cylinder' (बुक ए सिलेंडर) असा पर्याय निवडा

-याठिकाणी तुम्हारा भारतगॅस प्रोव्हायडर म्हणून निवडावा लागेल

-त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी दाखल करा

-यानंतर QR Code स्कॅन करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.