(Photo Credits: Getty Images)

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. युवराज ने मुंबईत पत्रकार परिषद बोलावून आपला निवृत्तीचा निर्णय सांगितला. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीनं सांगितले. युवराजच्या नावावर 2007चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि 19  वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत आणि हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एक खेळाडू आहे. मात्र, युवराज मागील दोन वर्षे एकही वनडे किंवा टी-ट्वेंटी सामना खेळाला नाही.

आपल्या निवृत्तीबाबत सिक्सर किंग म्हणाला, निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नक्की नव्हता. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता.

आपल्या कसोटी कारकिर्दीत, युवराजने 40 सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये 304 सामन्यात 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या, तर वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या.

युवराजच्या निवृत्तीची बातमी कळताच, नेटिझन्स सुद्धा भावुक झाले आणि २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकारांची आठवण काढली. तर काही जणांनी त्याला भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या योगदानासाठी त्याचे आभार मानले.