Year Ender 2019: विराट कोहली-रोहित शर्मा यांची 87 वर्षीय फॅनशी भेट, क्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडून लिओनल मेस्सी याला डिनरसाठी विचारणा यांसह अनेक घटनांनी संस्मरणीय ठरले हे 2019 वर्ष, (पाहा Video)
5 heart warming incidents in 2019 (Photo Credits: Twitter)

खेळाच्या मैदानावरील कामगिरी खेळाडूंना साधारण जनतेच्या नजरेत उभे करते. परंतु त्याऐवजी त्यांचे चाहत्यांसह मैदानवारी वर्तनासाठी त्यांचे कौतुक होत असते. वर्ष 2019 आता संपण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे, आपल्या खेळ विश्वातील आपले आयकन्सनीं चाहत्यांना बरेच क्षण दिले जे फक्त चर्चेचा विषयच नाही बनले, तर ते अनेक वर्ष चाहत्यांच्या लक्षात राहतील. इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषक 2019 दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याची प्रेक्षकांच्या वतीने मागितलेली माफी असो वा क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला डिनरसाठी विचारलेला क्षण, या प्रत्येक घटनेने आम्हाला प्रभावित केले आहे. आज आपण पाहूया खेळ जगतातील असे 5 क्षण जे आपल्या कायम लक्षात राहतील:

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची 87 वर्षीय फॅनशी भेट

वर्ष 2019मध्ये आयोजित क्रिकेट विश्वचषकमध्ये असे अनेक क्षण होते ज्यांनी सर्वांची मनं जिंकली. पण, भारतीय चाहत्यांसाठी सर्वात संस्मरणीय म्हणजे बांग्लादेशविरुद्ध विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी 87 वर्षीय फॅन चारुलता पटेल यांची भेट घेतली. स्टॅन्डमध्ये उपस्थित प्रेक्षकच नाही तर कॉमेंटेटर्सदेखी तिच्या आवेशाने खूप प्रभावित झाले आणि तिने तत्काळ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. यानंतर विराट आणि रोहितनेमॅच नंतर त्यांची भेट घेली. इतकेच नाही तर विराटने त्यांना सेमीफायनल आणि फायनल सामना बघण्यासाठी आमंत्रित केले. व्हिडिओ पाहा...

क्रिस्टियानो रोनाल्डोने लिओनेल मेस्सीला डिनरसाठी आमंत्रित केले

युईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार 2019-20 दरम्यान कट्टर प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी एकाच छताखाली एकत्र आले. ते दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते आणि पुरस्कार सोहळ्यादरम्यान गप्पा मारताना दिसले. पुरस्कारांपूर्वी रोनाल्डोने मेस्सीला डिनरसाठी आमंत्रित केले. "आमचे चांगले संबंध आहेत, अद्याप आम्ही एकत्र डिनर केले नाही, परंतु भविष्यात मला आशा आहे," जुव्हेंटस स्टार म्हणाला. पहा व्हिडिओ:

केन विल्यमसनने केले कार्लोस ब्रेथवेटला दिले सांत्वन

केन विल्यमसन यांनी कार्लोस ब्रेथवेटचे सांत्वन केले (Photo Credits: Twitter)

क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कार्लोस ब्रॅथवेट मैदानात विचलित झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. कीवी कर्णधार केन विल्यमसन कॅरेबियन खेळाडूला सांत्वन देताना दिसला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

केएल राहुलचा स्पोर्ट्सशिप अ‍ॅक्ट

जेव्हा टीम इंडिया कसोटी, वनडे आणि टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आला हे घडले. चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा भारतीय संघ मैदानात फिल्डिंग करत होता तेव्हा राहुलने आपल्या प्रामाणिकपणाने पंच इयान गोल्डचे मन जिंकले. राहुलने झेल पकडण्यासाठी त्याच्या उजवीकडे उडी मारली. फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर केमेंटेटर्सनाही वाटले की राहुलने यशस्वीरीत्या झेल पकडला. तथापि, राहुलने तातडीने बॉलचा टप्पा पकडल्याचे संकेत दिले.

स्टीव्ह स्मिथला ‘चीटर चीटर’ म्हणणाऱ्या प्रेसक्षकांना विराटने केलेले जेस्चर

विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील विश्वचषक मॅचदरम्यान विराट कोहली फलंदाजी करताना ही घटना घडली. स्मिथच्या प्रसिद्ध बॉल-टेम्परिंगच्या घटनेमुळे चाहत्यांच्या एका भागाने स्मिथला चीटर म्हणून बोलावले. हे कोहलीला योग्य वाटले नाही आणि त्याने चाहत्यांना स्मिथला चिडवू नये सांगितले.

खेळ जगतातील क्षण हे पाच आमच्याप्रमाणे सर्वांसाठी संस्मरणीय होते. आपल्या नजरेत अजून काही क्षण असतील ज्यांनी तुमचे मन जिंकले तर कमेंट विभागात मोकळ्या मनाने आमच्याशी शेअर करा. तोवर सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा!