Antim Panghal (PC - Twitter)

कुस्तीपटू अंतिम पंघल (Antim Panghal) ने 53 किलो वजनी गटात इतिहास रचला आहे. बल्गेरियात सुरू असलेल्या अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ( U-20 World Championships) सुवर्णपदक (Gold medal) जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. गेल्या वर्षी या भारतीय कुस्तीपटूने जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तिने अंतिम फेरीत तिची प्रतिस्पर्धी अल्टिन शागायेवा हिचा 8-0 असा पराभव केला.

अंतिमने केवळ सुवर्णपदकावरच कब्जा केला नाही तर आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले. तिने आपल्या श्रेणीत पूर्ण वर्चस्व राखले. प्रथम तिने युरोपियन चॅम्पियन ऑलिव्हिया अँड्रिचचा पराभव केला आणि नंतर जपानच्या अयाका किमुराला एका मिनिटात पिन केले. त्यानंतर तिचा युक्रेनच्या नतालीशी सामना झाला. (हेही वाचा - Sri Lanka ने Asia Cup साठी संघाची केली घोषणा, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज Dinesh Chandimal चा संघात समावेश)

वास्तविक, नताली ही एकमेव कुस्तीपटू होती जी, फायनलमध्ये 6 मिनिटे टिकू शकली. सरतेशेवटी, अंतिमचा सामना कझाकस्तानच्या अल्टिन शागायेवा विरुद्ध होता. अंतिमने शागायेवाचा 8-0 ने पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.

दरम्यान, अंतिम पंघलचा या ऐतिहासिक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “गर्वाचा क्षण. इतिहास रचल्याबद्दल आणि अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बनल्याबद्दल अंतिम पंघलचे अभिनंदन. भारत तुमच्या मेहनतीला आणि वचनबद्धतेला सलाम करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा"