सध्या आस्ट्रेलियात मार्श कप (Marsh Cup) सुरु असून मंगळवारी साऊथ आस्ट्रेलिया (South Australia) आणि विक्टोरिया (Victoria) यांच्यात सामना पार पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच विक्टोरिया संघाकडून खेळत होता. या सामन्या दरम्यान आरोन फिंचने (Aaron Finch) आपल्या अंदाजात फलंदाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा सामना पाहण्यासाठी काही क्रिकेट चाहते मैदानात उपस्थित होते. त्यावेळी ऍडम झंपाच्या (Adam Zampa) गोलंदाजीवर लॉन्ग ऑफला षटकार लगावला. त्यावेळी सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्याच्या जोडीदाराकडे झेल गेला. सुरुवातीला जोडीदाराने झेल पकडला असे त्या क्रिकेट चाहत्याला वाटले. परंतु, अखेरिस आपल्या जोडीदाराने झेल सोडल्याचे त्या क्रिकेट चाहत्याला कळाले. त्यानंतर त्याने काय करत आहेस तू असे बोलत त्याच्यावर राग व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
साऊथ ऑस्ट्रेलिया आणि विक्टोरिया यांच्यात रोमांचक असा सामना पार पडला. साऊथ ऑस्ट्रेलिया संघाने विक्टोरिया संघापुढे 323 धावांच आव्हान ठेवले होते. या आव्हानच पाठलाग करताना आरोन फिंच याने तडाखेबाज फलंदाजी केली. परंतु आरोन फिंचची 119 धावांची खेळी व्यर्थ गेली. विक्टोरियाच्या संघाला हा सामना केवळ एका धावांनी गमवावा लागला. मात्र, या सामन्यात चाहत्याने मैदानात केलेले हे कृत्य अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. सामना सुरु असताना ऍडम झंपा याच्या गोलंदाजीवर लॉन्ग ऑफला शानदार षटकार लगावला. त्यावेळी मैदानात असलेल्या चाहत्याच्या जोडीदाराकडे झेल गेला. परंतु, झेल सुटल्याने क्रिकेट चाहत्याने त्याच्या जोडीदारावर नाराजी व्यक्त केली. तसेच काय करत आहेस तू, अशी प्रतिक्रियाही दिली.
पाहा संपूर्ण व्हिडिओ-
'What are you doing!?'
Some brutal feedback from this fan's mate after he dropped Aaron Finch in the crowd 😲😂 #MarshCup pic.twitter.com/yV7AXLgv06
— cricket.com.au (@cricketcomau) November 19, 2019