ENG vs IND 5th Test: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामना रद्द झाल्यानंतर BCCI ने केले पहिले विधान, वाचा काय दिली प्रतिक्रिया ?
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारत आणि इंग्लंडमधील (Eng vs Ind) कोरोना (Corona) संकटामुळे मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Manchester's Old Trafford) मैदानावर खेळलेला सामना रद्द करण्यात आला. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमधील परस्पर संमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सामना रद्द करण्याबाबत ईसीबीने (ECB) जारी केलेल्या सुरुवातीच्या निवेदनामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर यजमान मंडळाला आपले विधान बदलावे लागले. ईसीबीने आधी आपल्या निवेदनात म्हटले होते की, भारतीय संघाने सामना गमावण्याबाबत बोलले होते, पण नंतर त्यांनी आपले विधान बदलले.  अशा परिस्थितीत, मालिकेच्या निकालाबाबत दोन्ही संघांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर जेव्हा निर्णय घेता आला नाही, तेव्हा बीसीसीआयने (BCCI) ईसीबीसमोर संधी दिल्यास भविष्यात सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.

पाचवा कसोटी सामना रद्द केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने म्हटले आहे की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीई यांच्यातील दृढ संबंध लक्षात घेऊन बीसीसीआयने ईसीबीला रद्द केलेली कसोटी मॅच पुन्हा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डांना हा सामना आयोजित करण्यासाठी योग्य संधी मिळेल. बीसीसीआयच्या या प्रेस रिलीझचा सरळ अर्थ असा आहे की जर ईसीबी त्याच्या प्रस्तावास सहमत असेल तर ही मालिका भारताची 2-1 अशी आघाडी कायम ठेवेल. परंतु मालिकेचा निर्णायक सामना भविष्यात नवीन वेळापत्रकासह खेळला जाईल.

मँचेस्टर कसोटी रद्द करण्याचा निर्णय भारतीय संघाचे दुसरे फिजिओ योगेश परमार यांना एक दिवस अगोदर संसर्गग्रस्त आढळल्यानंतर घेण्यात आला. भारतीय खेळाडूंच्या दोन आरटी-पीसीआय चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी खेळाडूंना याबाबत भीती होती. अखेरीस मँचेस्टर कसोटीत कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. भारतीय संघाला रद्द करणे भाग पडले.

इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न नाट्यमयपणे संपले आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेचा मध्यांतर नाट्यमय होता. जरी त्याचा अंतिम अध्याय भविष्यात लिहिला जाईल. पण राहुल द्रविडनंतर 21 व्या शतकात इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे विराट कोहलीचे स्वप्न सध्या अपूर्ण राहिले आहे. भारतीय संघ 2-1 अशी आघाडी घेऊन मायदेशी परतणार आहे. भारतीय संघातील कोरोनाचा डाव दोन्ही संघांना कित्येक महिने सामन्यासाठी दुर ठेवेल हे सांगणे कठीणच आहे.