टीम इंडिया (Team India) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात आज हाँगकाँगशी (Hong Kong) भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास रचण्याची संधी आहे. जर टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध विजयाची नोंद केली, तर रोहित शर्मा विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकून T20 फॉर्मेटमध्ये भारतातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. एमएस धोनी (MS Dhoni) हा टी20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने कर्णधार असताना 72 पैकी 41 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 30 टी20 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या विजयासह रोहित शर्माने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 30 सामनेही जिंकले आहेत. जर टीम इंडियाने बुधवारी हाँगकाँगचा पराभव केला, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 31 वा विजय असेल. हेही वाचा ICC Media Rights: वर्ल्ड कपसह आयसीसी टूर्नामेंटसाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकारांची वेगवेगळी विभागणी, घ्या जाणून
तो विराट कोहलीला मागे टाकून T20 फॉर्मेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड खूप चांगला आहे. रोहित शर्माने आत्तापर्यंत 36 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून 30 सामन्यांमध्ये त्याला विजय मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने 50 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवल्यानंतर 30 सामने जिंकले होते.
दुसरीकडे, आशिया चषकाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत स्पर्धेत शानदार सुरुवात केली. पाकिस्तानविरुद्ध विजय नोंदवून टीम इंडियाचा सुपर 4 गाठण्याचा मार्ग सोपा झाला आहे. भारताने हाँगकाँगलाही हरवल्यास सुपर 4 मध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ बनेल. यापूर्वी अफगाणिस्तानने बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत करून सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.