IND vs SL: श्रीलंकेचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
IND vs SL

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय मालिका (ODI Series) सुरू झाली आहे. नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये खेळली जाणारी ही भारताची पहिली एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्यात नाणेफेक करताना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शांकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करणार हे स्पष्ट आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार - रोहित शर्मा आणि दासुन शांका यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. हा दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. हेही वाचा BBL 2023: सीमारेषेवर बेन कटिंगचा अप्रतिम झेल, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

यापूर्वी 2018 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात येथे पहिला सामना झाला होता. हा उच्च स्कोअरिंग सामना भारताने 8 विकेटने जिंकला. त्या सामन्यात रोहित आणि विराट दोघांनीही शतके झळकावली होती. हेही वाचा IND vs SL Live Streaming: जाणून घ्या भारत-श्रीलंका पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल ?

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन

कुसल मेंडिस, पथम निसांका, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चारिथ असालंका, दासुन शांका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलेझ, कसून राजित, दिलशान मधुशंका