दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दिल्ली T20 सामन्यात भारताला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने 19.1 षटकांत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि डेर ड्युसेन यांनी तुफानी खेळी खेळली. डुसेनने नाबाद 75 धावा केल्या. तर इशान किशनने भारताकडून विक्रमी खेळी खेळली. टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकन संघासाठी क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा सलामीला आले. बावुमा अवघ्या 10 धावा करून बाद झाला. तर डी कॉकने 22 धावांचे योगदान दिले. प्रिटोरियस 29 धावा करून बाद झाला. त्याने 13 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.
आफ्रिकन डावात भारताकडून अक्षर पटेलने 4 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला. आवेश खानने 4 षटकात 35 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 43 धावा देत एक विकेट घेतली. हर्षल पटेलने 4 षटकात 43 धावा देत 1 बळी घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 4 गडी गमावून 211 धावा केल्या. हेही वाचा IND vs SA 1st T20: इशान किशनच्या जोरदार खेळीने मोडला विराट कोहलीचा विक्रम
यादरम्यान इशान किशनने शानदार खेळी केली. ईशानने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्याने केवळ 12 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. पंड्याच्या खेळीत 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. कर्णधार ऋषभ पंतने 16 चेंडूत 29 धावा केल्या. पंतने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. ऋतुराजने 23 धावांचे योगदान दिले.